‘दीया और बाती हम’ च्या अभिनेत्रीची अजब तऱ्हा : ...

‘दीया और बाती हम’ च्या अभिनेत्रीची अजब तऱ्हा : तिने स्वतःशीच लग्न लावले, म्हणते कशी, ‘मला पुरुष नकोच…’ (‘Diya Aur Baati Hum’ actress Kanishka Soni marries herself, shares pics flaunting sindoor and mangalsutra, Says- I don’t need any Man Ever)

‘दीया और बाती हम'(Diya Aur Baati Hum), ‘पवित्र रिश्ता’ (Pavitra Rishta) आणि ‘देवी आदि पराशक्ति’ (Devi Adi Parashakti) यांसारख्या अनेक यशस्वी मालिकांमध्ये काम करणाऱ्या कनिष्का सोनीने स्वतःशीच लग्न केले आहे. तिची ही बातमी सोशल मीडियावर धुमाकुळ माजवत आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो पाहून चाहत्यांना तर धक्काच बसला आहे.

कनिष्काने इंस्टाग्राम वर एक व्हिडियो शेयर केला आहे ज्यात ती तिचे सिंदूर आणि मंगळसूत्र फ्लाँट करताना दिसत आहे. कनिष्काने तिच्या फोटोजना कॅप्शनदेखील दिली आहे, जी वाचल्यानंतर लोकांचे होशच उडणार आहेत. अभिनेत्रीने सांगितले की, तिने स्वतःशीच लग्न केले आहे आणि तिला पुरुषाची गरज नाही.  

वास्तविक, 16 ऑगस्टला कनिष्का सोनीने तिचा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी, तिने तिचे सिंदूर आणि मंगळसूत्र घातलेले दोन फोटो शेअर केले आहेत आणि हे गाणे गातानाचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या छायाचित्रांमध्ये कनिष्का भांगात सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र घातलेली दिसत आहे. यासोबतच अभिनेत्रीने एक लांबलचक पोस्टही लिहिली आहे.

तिने लिहिले की, “मी माझी सर्व स्वप्ने पूर्ण केली तेव्हाच स्वतःशी लग्न केले होते. मी स्वतःवर सर्वात जास्त प्रेम करते. सगळ्या प्रश्नांची उत्तरे अशी आहेत की मला कोणत्याही पुरुषाची गरज नाही आहे. मी एकटी खूप आनंदी आहे आणि या एकटेपणात माझ्यासोबत गिटार आहे. मी बलवान आहे, मी शक्तीशाली आहे. शिव आणि शक्ती हे सर्व माझ्यात आहेत. धन्यवाद.”

दुसऱ्या कॅप्शनमध्ये कनिष्काने लिहिले की, “फेसबुक हॅकर्स ज्यांना मी स्वतःशी लग्न केलेले आवडले नाही आणि जे मला शिक्षा करू इच्छितात, त्यांनी माझ्या फेसबुक मित्र आणि चाहत्यांपासून दूर राहा. तेरी हर भूल में कहीं हम भी शामिल हैं गुनहगारों में”

टेलिव्हिजनवरील अनेक हिट मालिकांचा हिस्सा असलेल्या कनिष्का सोनीने सध्या टेलिव्हिजनला बायबाय केले असून ती हॉलीवुडमध्ये प्रवेश करण्याचा प्लान करत आहे.