मालिकांमध्ये रंगणार दिवाळीचा जल्लोष (Diwali Cel...

मालिकांमध्ये रंगणार दिवाळीचा जल्लोष (Diwali Celebrations In T.V. Serials)

आनंदाचा , उत्साहाचा आणि आपापसातले हेवेदावे विसरायला लावणारा सण  म्हणजे दिवाळी. अशा या प्रकाशाच्या सणाचे प्रतिबिंब मराठी मालिकांमध्ये पडलेले दिसून येते. दिवाळीच्या या दिवसात मालिकांमध्ये जल्लोष रंगतो आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांमध्ये ही रंगत वाढते आहे. ‘सहकुटुंब सहपरिवार ‘ या मालिकेमध्ये पश्या तुरुंगात आहे पण त्याची सुटका करण्याचा मामीने घेतलेला निर्णय कसा यशस्वी होतो, ते दिवाळी निमित्त दिसेल.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं ‘ या मालिकेत शिर्केपाटील  कुटुंब कबड्डीचा सामना जिकंण्यासाठी दिवस-रात्र सराव करीत आहेत. त्यामुळे त्यांची दिवाळी साधेपणाने साजरी होत आहे.

‘ठिपक्यांची रांगोळी’ या रंगतदार मालिकेत कानेटकर कुटुंबात दिवाळसण पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात साजरा होत आहे. फराळ, अभ्यंगस्नान , लक्ष्मी पूजन, पाडवा, भाऊबीज हे सगळे साग्रसंगीत पार पडणार आहे.

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत इनामदार कुटुंब दिवाळी साजरी करीत असलं तरी कार्तिकी या समारंभात सामील होणार की नाही याची उत्सुकता आहे.

या चारही मालिकांचे दिवाळी विशेष भाग साजरे होणार आहेत.