परदेशात महिनाभर दिवाळी (Diwali Celebrations For...

परदेशात महिनाभर दिवाळी (Diwali Celebrations For A Month In Eastern Country)

आमच्याकडे दिवाळसण काही  दिवसांचा असतो. परंतु आपल्या देशाशी स्नेहपूर्ण संबंध ठेवणाऱ्या सिंगापूरमध्ये ही दिवाळी महिनाभर साजरी केली जाते. तसे पूर्वेकडील देश , जसे मलेशिया, इंडोनेशिया ,बँकॉक इथे भारतीय नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. तिकडे देखील दिवाळी मोठ्या प्रमाणावर साजरी होते परंतु सिंगापुरातील दिवाळी लक्षणीय असते.

या संपूर्ण शहरात दुकानदार व शासनातर्फे रस्तोरस्ती रोषणाई केली जाते. अन विविध करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदाच्या वर्षी दाक्षिणात्य मंदिराच्या पद्धतीचे गोपुरम हे प्रवेशद्वार करण्यात आले असून रोज संध्याकाळी फटाक्यांची आतषबाजी होत आहे. ही दिवाळी आभासी पद्धतीने देखील साजरी होत आहे.

शहरातील लिटिल इंडिया या परिसरात दागदागिने , कपडे , फटाके आणि खाद्यपदार्थांची रेलचेल असलेले स्टॉल्स लावण्यात आले असून कराओके स्पर्धा व बक्षिसांचे आकर्षण ठेवण्यात आले आहे.
४ नोव्हेंबर ला ऑनलाईन मेगा इव्हेन्ट होणार असून त्यामध्ये गीत-संगीत, नृत्य, नाटक व इतर करमणुकीचे कार्यक्रम होणार आहेत.