कास्टिंग काऊच बाबत दिव्यांका त्रिपाठीला आलेले भ...

कास्टिंग काऊच बाबत दिव्यांका त्रिपाठीला आलेले भयंकर अनुभव : करिअर बरबाद करण्याची धमकी देण्यात आली होती. (Divyanka Tripathi Recalls Casting Couch Experience : Reveals Threats To Ruin Career)

कास्टिंग काऊच, अर्थात काम देण्याबाबत शय्यासोबत करण्याची गळ घालणे, ही  बॉलिवूडमध्ये नवी गोष्ट राहिलेली नाही. कित्येक मोठया अभिनेत्रींना त्याचा अनुभव आलेला आहे. आता टेलिव्हिजन कलाकार दिव्यांका त्रिपाठीने देखील या संदर्भात तिला आलेले भयंकर अनुभव शेअर केले आहेत.

अलीकडे एका मुलाखतीत दिव्यांकाने सांगितले की, हे सर्व तिला भोगावं लागलं आहे.
दिव्यांका म्हणते, ” तुमचा एक शो संपला की, दुसरा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. माझ्यावर असा प्रसंग आला होता की, घरखर्च भागवायला, हप्ते भरायला माझ्याकडे पैसे नव्हते. मोठा ब्रेक मिळण्याची मी वाट पाहत होते. तेव्हा मला सांगण्यात आलं की, एका दिग्दर्शकासोबत थोडे दिवस घालव. मोठा ब्रेक मिळेल.” अशी तडजोड मात्र दिव्यांकाने केली नाही.

दिव्यांकाने असंही  पुढे सांगितलं की, तिला करिअर बरबाद करण्याची धमकी दिली गेली. “अशी माणसं आपल्यावर बिंबवतात की, या क्षेत्रात सगळ्या जणी असं करतात. हे सर्व नार्मल आहे. असं काही केलं नाहीस, तर तू मागे पडशील.”

आणखी एक घटना दिव्यांकाने सांगितली, “प्रॉडक्शनचा एक माणूस माझ्या मागे लागला होता. मला पटवण्याचा प्रयत्न करत होता. पण मला त्याच्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. तेव्हा त्याने चिडून मला धमकी दिली की, तुझं जीवन उदध्वस्त करून टाकीन. त्याने पुढे माझ्यासमोर अडचणी निर्माण केल्या.”

“पण मला कळत होतं की, हे सगळं वायफळ आहे. याच्याने माझ्या करिअर वर परिणाम होणार नाही. मला पहिलं काम माझ्या टॅलेन्ट मुळे मिळालं होतं . त्यामुळे पुढेही मिळेलच.  माझे मम्मी-पप्पा आणि दीदी यांनी मला चांगली शिकवण दिली होती. त्यामुळे मी परिस्थिती हाताळू शकले.”

दिव्यांकाने यापूर्वी देखील कास्टिंग काऊच संदर्भात आपले अनुभव कथन केले आहेत. टी. व्ही. ची ही लोकप्रिय बहू सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अन नेहमीच आपली बोल्ड व बिनधास्त मतं मांडत असते.