दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया मालदीवला साज...

दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया मालदीवला साजरा करत आहेत लग्नाचा सहावा वाढदिवस (Divyanka Tripathi And Vivek Dahiya Celebrate Their 6th Wedding Anniversary In Maldives, See Pictures)

दिव्यांका त्रिपाठी आणि पती विवेक दहिया यांची जोडी लोकांच्या आवडत्या जोड्यांपैकी एक आहे. दोघांच्याही चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. दोघेही अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात आणि चाहत्यांची पसंती मिळवत असतात. दिव्यांका आणि विवेक यांनी ८ जुलै २०१६ ला लग्न केले. त्यांच्या लग्नाला आता सहा वर्षे पूर्ण झाली आहेत.

७ जुलैला दिव्यांकाने तिच्या इन्स्टा अकाउंटवर विवेकसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. त्यात लिहिलेले की, सहा वर्षांपूर्वी आजच्या दिवशी आमचे संगीत होते. फोटोमध्ये ते दोघे विमानात असल्याचे दिसत होते. नक्कीच दोघे लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर फिरायला जात असणार.

आता विवेक आणि दिव्यांकाने त्यांच्या नव्या इन्स्टा पोस्ट आणि स्टोरीमधून ते कुठे फिरायला गेले याचा उलगडा केला आहे. दिव्यांका आणि विवेक त्यांच्या लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला गेले आहेत. दोघेही तिथले त्यांचे मस्ती करतानाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत आहेत.

पोस्टमध्ये विवेक वाइन, जेवण आणि म्युझिकचा आस्वाद घेत आहे. दिव्यांकाही त्याच्यासोबत डान्स करत आहे.

काही दिवसांपूर्वीच मिका दी वोटी या शोमध्ये दिव्यांकाने तिच्या व विवेकच्या नात्याबद्दल सांगितले. दिव्यांका म्हणाली की, ‘विवेक खूप प्रेमळ माणूस आहे. कधी कधी तर मला आश्चर्य वाटतं की, कोणी इतकं चांगलं कसं काय असू शकतं. आम्ही अनेकदा एकमेकांच्या आवडीची गाणी लावून नाचतो.’

दिव्यांकाचे लग्न होण्यापूर्वी ती शरद मल्होत्रासोबत रिलेशनमध्ये होती. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. त्यानंतर तिच्या आयुष्यात विवेक आला आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले.

दिव्यांकाच्या या पोस्टने आत्ताच इऩ्स्टाग्रामवर २०मिलियन फॉलोवर्सचा टप्पा पार केला आहे. यावरुन आपण तिच्या लोकप्रियतेचा अंदाज लावू शकतो.