२५ लाख जिंकून बिग बॉस ओटीटीची पहिली विजेती ठरले...

२५ लाख जिंकून बिग बॉस ओटीटीची पहिली विजेती ठरलेली दिव्या अग्रवाल आहे तरी कोण? (Divya Agarwal Becomes Bigg Boss OTT Winner, Wins RS 25 Lakh And Trophy)

नुकताच ‘बिग बॉस ओटीटी’चा फिनाले पार पडला असून दिव्या अग्रवालने या शोमध्ये विजेतेपद पटकावत ट्रॉफीसह २५ लाख रुपये रक्कम जिंकली आहे. ओटीटीवर ८ ऑगस्टपासून बिग बॉस शो सुरू झाला आहे. पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘बिग बॉस’चा हा सिझन पार पडला होता. अन्‌ करण जोहरने हा संपूर्ण सिझन होस्ट केला.

Divya Agarwal Becomes Bigg Boss OTT Winner

या शोमध्ये निशांत भट्ट रनरअप ठरला असून शमिता शेट्टी तिसऱ्या स्थानावर राहिली. चार स्पर्धकांमधील प्रतीक सहजपालने २५ लाख रुपये घेऊन विजेता होण्याच्या शर्यतीतून आधीच स्वतःला बाहेर केले होते. अन्‌ राकेश बापट या शोपर्यंतही पोहचू शकला नाही.

Divya Agarwal Becomes Bigg Boss OTT Winner

हा शो जवळपास हजार तासांकरीता लाइव्ह होता. रितेश देशमुख आणि जिनेलियाने फिनालेमध्ये खास हजेरी लावली होती. या जोडप्याने सर्व स्पर्धकांसोबत खूप मजा केली. शोच्या पहिल्या दिवसापासूनच दिव्या अग्रवाल चांगलीच चर्चेत होती. शिमिता शेट्टी आणि दिव्या मधील वाद चांगलाच चर्चेत आला होता. इतक्या स्पर्धकांमध्ये राहून, फिनालेपर्यंत जाणं व जिंकणं दिव्यासाठी नक्कीच सोपं नव्हतं. तरीही तिने विजेतेपद पटकावलं आहे. कोण आहे ही दिव्या अग्रवाल?

Divya Agarwal Becomes Bigg Boss OTT Winner

कोण आहे दिव्या अग्रवाल?

बिग बॉस ओटीटीमध्ये येण्यापूर्वी दिव्या अग्रवालने अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. यापूर्वी, ती एमटीव्ही एस ऑफ स्पेसच्या पहिल्या हंगामाची ती विजेती होती, तर एमटीव्ही स्प्लिट्सविलामध्ये ती उपविजेती होती. सोशल मीडियावर तिचे जबरदस्त चाहते आहेत.

दिव्या अग्रवाल एक अभिनेत्री आणि मॉडेल असून ती एक डान्सरदेखील आहे. दिव्याने कोरिओग्राफर टेरंन्स लुईसच्या डान्स अकेडमीमधून डान्सचं प्रशिक्षण घेतलंय. यानंतर दिव्याने स्वत:ची डान्स अकेडमी सुरु केली. दिव्याने बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना कोरिओग्राफ केलं आहे.

(फोटो सौजन्य – वुट/ इन्स्टाग्राम)