पाच वर्षांपासून सीरियलमध्ये दिशा वकानी दिसत नाह...

पाच वर्षांपासून सीरियलमध्ये दिशा वकानी दिसत नाहिये, तरी पण तिची कमाई बऱ्यापैकी आहे… आणते कुठून हा पैसा? (Disha Wakani Is Away From The Serial For Five Years, Still Earns A Lot, Know Where Money Comes From)

भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वाधिक काळ सुरू असलेली ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका एक दशकाहून अधिक काळ आपल्या दर्शकांचं मनोरंजन करत आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण ही मालिका अतिशय आवडीने पाहताना दिसतात. या मालिकेतील कलाकारांनी तर चाहत्यांच्या मनात कायमस्वरुपी जागा मिळवली आहे. आता हेच बघा, तारक मेहतामधील दयाबेन अर्थात्‌ दिशा वकानी गेली पाच वर्षे सीरियलमध्ये दिसत नाही आहे, तरी पण तिची कमाई बऱ्यापैकी आहे. सध्या तिच्याकडे हा पैसा कोठून येतोय, ते जाणून घेऊया.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

टीवी शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ची सुरुवात २८ जुलै २०१३मध्ये झाली होती आणि तेव्हापासून आजतागायत हा शो आपली लोकप्रियता टिकवून आहे. मालिकेतील सर्वच कलाकार घराघरांत परिचयाचे झाले आहेत. आत्तापर्यंत काही कलाकारांनी ही मालिका मध्येच सोडली असली तरी लोक त्यांना या मालिकेतील नावानेच ओळखतात. तारक मेहतामधील दिशा वकानीबद्दल असंच म्हणायला हवं. तिला तिच्या खऱ्या नावापेक्षा दयाबेन म्हणूनच लोकं ओळखतात.  

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

मालिकेत काम करत असताना, त्या शोची ती जान होती. तिच्या अभिनयाबरोबरच तिचा हरेक अंदाज लोकांच्या पसंतीस येत होता. म्हणूनच शो सोडून बरीच वर्षं झाली तरी लोकांना तिच्या परतण्याची आशा आहे. ते तिची मनापासून वाट पाहाताहेत. दिशाने २०१७ मध्येच मालिका सोडली होती. परंतु आजही तिची लोकप्रियता टिकून आहे.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

दिशा वकानी अजूनपर्यंत मालिकेत परतली नाही शिवाय ती इतरही कोणत्या शोमध्ये काम करताना दिसत नाहीये. तरीही ती अतिशय ऐषोआरामाचे जीवन जगत आहे. तारक मेहताच्या एका एपिसोडसाठी लाखोने ती मानधन घेत होती. ती शोमधील सर्वाधिक मानधन घेणारी कलाकार होती. या शो व्यतिरिक्त दिशाने अनेक बी ग्रेड चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. तिने आपल्या अभिनयाने या इंडस्ट्रीमध्ये आपली एक वेगळी छाप सोडली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार दिशाची एकूण संपत्ती ३७ कोटी इतकी आहे. सध्या ती मालिकेत जरी काम करत नसली तरी जाहिरातींमधून काम करूनही ती बक्कळ पैसा कमावत आहे.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

दिशा वकानीच्या खाजगी आयुष्याबद्दल सांगायचं तर तिने २०१५ मध्ये मुंबईतील बेस्ट चार्टर्ड अकाऊंटंट मयूर पांड्यासोबत लग्न केले आणि त्यानंतर २०१७ साली ती एका मुलीची आई झाली. मुलीला सांभाळण्याकरताच तिला मालिका सोडावी लागली होती. सध्या ती पूर्ण वेळ आपल्या कुटुंबासोबतच घालवते. दरवेळी दिशा तारक मेहतामध्ये परत येणार असल्याच्या बातम्या ऐकू येतात, पण अजून तरी ती काही परत आलेली नाही.