‘तारक मेहता…’ ची दयाबेन दिशा वकानी, झाली दुसऱ्य...

‘तारक मेहता…’ ची दयाबेन दिशा वकानी, झाली दुसऱ्या मुलाची आई (Disha Vakani aka Dayaben of ‘Taarak Mehta…’ welcomes 2nd child, blessed with a baby boy)

‘तारक मेहता का उलटा चश्मा’ हा सध्या टेलीव्हिजन विश्वातील विशेष चर्चेचा विषय झाला आहे. (Tarak Mehta ka Ooltah Chashmah) ही मालिका प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध असून गेली अनेक वर्ष या मालिकेतील कलाकारही घराघरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यात यशस्वी ठरले आहे. पण गेल्या काही दिवसांत या मालिकेत तारक मेहता ही महत्त्वाची भूमिका करणारे शैलेश लोढा आणि चाहत्यांमध्ये हॉट बबिता म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मुनमुन दत्ता(Munmun Dutta) मालिकेतून एक्झिट घेत आहेत ही बातमी सर्वत्र पसरली. या बातमीने चाहते नाराज झाले असतानाच अगदी कालच दयाबेन मालिकेत परतत असल्याच्या बातमीने त्यांना सुखावले. आणि आता खुद्द दयाबेननेच एक आनंदाची बातमी दिली आहे.

दिशा वकानी दुसऱ्यांदा आई बनली आहे. तिने मुलाला जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी कळताच चाहते दिशा वकानीला शुभेच्छा देत आहेत.

दिशा वकानी (Disha Vakani) बरीच वर्षं ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या शोपासून दूर आहे. आणि तिचे चाहते या शो मध्ये तिच्या परतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. दिशाने काही दिवसांपूर्वीच एका मुलाला जन्म दिला असल्याच्या बातमीवर तिचे पती मयूर पाडिया (Mayur Padia) आणि भाऊ मयूर वकानी (Mayur Vakani) यांनी शिक्कामोर्तब केले आहे.

दिशा वकानीचा ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन भाऊ सुंदरलाल म्हणजेच मयूर वकानी पुन्हा मामा बनल्याने अतिशय खुश आहे. २०१७ मध्ये दिशाला मुलगी झाली आणि आता ती पुन्हा आई आणि मी दुसऱ्यांदा मामा झालो आहे. यासाठी मी खूप खुश आहे, असे त्याने म्हटले आहे.

दिशा वकानीने २४ नोव्हेंबर २०१५ साली अतिशय खासगी समारंभामध्ये मयूर पांड्यासोबत लग्न् केलं, त्यानंतर २०१७ साली तिने स्तुति या मुलीला जन्म दिला. मुलीकडे लक्ष देण्याकरता तिने आपलं सक्सेसफुल करियर पणास लावलं आणि मदरहुड एन्जॉय केलं. तिने ही मालिका सो्डून ५ वर्ष झाली आहेत, तरी तिचे चाहते आजही तिला मिस करतात. आणि ती शोमध्ये परत यायची आतुरतेने वाटत पाहताहेत. काल तर खुद्द निर्मात्यांनीच दयाबेन मालिकेत परतत असल्याची बातमी दिली होती

डिसेंबर २०२१ मध्ये दिशा एका कौटुंबिक समारंभात बेबी बंप दाखवताना दिसली होती, त्यावेळी तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. परंतु दिशाने आपल्या दुसऱ्या बाळंतपणाबद्दल कुणालाच काही खबर लागू दिली नाही.

दिशा वकानी तारक मेहतामध्ये २०१९ च्या एका एपिसोडमध्ये शेवटची दिसली होती. सध्या शोचे निर्माते असित कुमार मोदी यांनी दयाबेन ही व्यक्तिरेखा शो मध्ये परतू शकते असे म्हटले आहे. एका मुलाखतीत ते म्हणाले, ‘दयाबेन या भूमिकेला मालिकेत पुन्हा न आणण्याचा विचार आम्ही कधी केलाच नाही. मात्र गेल्या काही वर्षांत करोनामुळे आपण सर्वचजण एका कठीण काळातून जात आहोत. पण आता आम्ही दयाबेनला मालिकेत आणण्याचा विचार करत आहोत. त्यामुळे प्रेक्षकांना जेठालाल आणि दयाबेन यांच्यातील भन्नाट केमिस्ट्री आणि निखळ मनोरंजन पुन्हा एकदा अनुभवता येईल.” तर दुसरीकडे दिशाचे पती मयूर यांनी अभिनेत्री मालिकेत पुन्हा येईल असे आश्वासन दिले असले तरी नुकतंच बाळ झाल्याने दिशाचे शोमध्ये परत येणे कठीण वाटत आहे.