पहा दिशा पटणीचे घायाळ करणारे फोटो (Happy Birthd...

पहा दिशा पटणीचे घायाळ करणारे फोटो (Happy Birthday : Disha Patni’s Stunning Look Goes Viral )

अभिनेत्री दिशा पटणी बॉलिवूडमध्ये तिच्या सौंदर्य आणि फिटनेससाठी ओळखली जाते. आज १३ जूनला दिशाचा वाढदिवस आहे. दिशाने तिच्या करियरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले. एमएस धोनी या चित्रपटात ती सुशांत सिहं राजपूतसोबत दिसली होती तर बागी २ मध्ये अभिनेता टायगर श्रॉफसोबत दिसलेली. दिशाने बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानसोबत सुद्धा स्क्रीन शेअर केली आहे. अभिनयाव्यतिरीक्त ती तिच्या बोल्ड लूकमुळे जास्त चर्चेत असते.

दिशाने काही दिवसांपूर्वीच तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत तिने लाल रंगाचा ड्रेस घातला होता. त्या ड्रेसवर तिने डार्क लिपस्टिक लावली होती आणि केस मोकळे सोडले होते. तिचे ते घायाळ करणारे सौंदर्य पाहून तिचे चाहते खूप खूश झाले.

दिशा तिच्या स्टाइलिश लूकसाठी ओळखली जाते. या फोटोत तुम्ही पाहू शकता तिने जांभळ्या रंगाचा मिनी ड्रेस घातला असून त्यावर कर्ली हेअरस्टाइल, मॅचिंग कानातले आणि हाय हील्स असा लूक केला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

दिशाचा हा स्वीमिंग पूलमधला फोटो तिच्या चाहत्यांना फार आवडला. तिने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताच त्याला १३ लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या. तर हजारो कमेंटस् करुन चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.

समुद्र किनारी सन बाथ घेतानाचा दिशाचा फोटो मंध्यतरी खूप व्हायरल झाला होता. या फोटोत तिने बोल्डनेसच्या सर्व सीमा पार केलेल्या दिसतात. चाहत्यांना तिचा हा लूकसुद्धा फार आवडला.

फिटनेससोबतच बोल्डनेसमध्ये सुद्धा दिशा इतर अभिनेत्रींना मागे टाकते. इन्स्टाग्रामवर तिचे अनेक बोल्ड फोटो तुम्हाला पाहायला मिळतील. या फोटोत दिशा गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये समुद्र किनारी मजा करताना दिसते.

सोनेरी रंगाच्या या ड्रेसमध्ये दिशा फारच सुंदर दिसत आहे. या फोटोत तिने डीप नेक ड्रेस घातलेला दिसतो. इन्स्टाग्रामवर या फोटोला १६ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले. शिवाय तिच्या चाहत्यांनी कमेंटमधून पण तिचे कौतुक केले होते.

अभिनेत्री दिशा पटणीचा हा फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत होता. यात अभिनेत्री बिकिनीवर पाण्यात मजा करताना दिसते. या फोटोला १८ लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले होते. फोटोतील दिशाचा अंदाज पाहून ती जलपरीसारखी दिसत असल्याचे चाहत्यांनी सांगितले.

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिशा फारच आकर्षक दिसत आहे. या ड्रेसवर तिने मिनिमल मेकअप लूक दिलेला जो तिच्या चाहत्यांना फारच आवडल्यामुळे या फोटोला २० लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या.