दिशाचे एकापाठोपाठ एक बोल्ड फोटो पाहून चाहते होत...

दिशाचे एकापाठोपाठ एक बोल्ड फोटो पाहून चाहते होत आहेत घायाळ (Disha Patni Flaunts Her Toned Body In Bold Photoshoot)

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटणी चित्रपट आणि अभिनयापेक्षा जास्त आपल्या बोल्डनेस आणि हॉटनेससाठी प्रसिद्ध आहे. आता पुन्हा एकदा दिशाने मॅग्झिनसाठी हॉट फोटोशूट केले आहे. दिशाने हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. हे फोटो इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहेत. दिशाच्या या हॉट फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

दिशा पटणीच्या फोटोशूटबद्दल बोलायचे झाल्यास ती अनेकदा वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोशूट करत असते. दिशाच्या नवीन फोटोशूटमध्ये तिने स्ट्रॅपी ग्लिटर टॉप आणि काळ्या रंगाची ट्राउजर्स घातली आहे. हाय हिल्स घालून ती खूप मादक पोज देत आहे. तसेच तिने केलेला हलका मेकअप तिच्या सौंदर्यात भर पाडत आहे.

दिशाच्या दुसऱ्या फोटोबद्ल बोलायचे झाल्यास त्यात तिने हेवी वर्कवाली लेहंगा चोळी घालून खूर्चीत बसून मादक पोज देत आहे. या फोटोमध्ये तिने घातलेली ब्रालेट चोळी खूपच सुंदर दिसत आहे. कमेंट सेक्शनमध्ये चाहते तिच्या बोल्डनेसचे कौतुक करत आहेत.

दिशाच्या आणखी एका लूकबद्दल बोलायचे झाल्यास त्यात तिने लाल रंगाचे कपडे परिधान केले आहेत. यात ती आपल्या कपड्यांचे उत्तमरित्या प्रदर्शन करत आहे. अभिनेत्रीचा हा लूक सोशल मीडियावर वेगात व्हायरल झाला. लाल रंगाच्या नेटवाल्या बॉडीकॉन जंपसूटमध्ये  दिशा एकदम हॉट दिसत आहे.

आणखी एका फोटोत दिशा आपले सुंदर घनदाट केस हवेत उडवत फोटोसाठी पोज देत आहे. दिशाच्या या फोटोला लाखो लोकांनी लाइक केले आहे.

टायगर श्रॉफसोबत झालेल्या ब्रेकअपमधून दिशा स्वत:ला सावरत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांसोबत जोडलेली राहते.

दिशाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती काही महिन्यांपूर्वीच एक विलन रिटर्न या चित्रपटात दिसली होती. आता येत्या काळात ती योद्धा, के टीना आणि प्रोजेक्ट के या चित्रपटात दिसणार आहे.