दिशा पटणीला आपल्यापेक्षा लहान असलेल्या मुलांशी ...

दिशा पटणीला आपल्यापेक्षा लहान असलेल्या मुलांशी रोमान्स करण्याची इच्छा कारण ऐकून चकीत व्हाल (Disha Patani Wants To Romance With Boys Younger Than Her, You Will Be Surprised To Know)

बॉलिवूड इंडस्ट्रीत सौंदर्य आणि फिटनेसचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री दिशा पटणी. दिशाला  तिच्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या  मुलांसोबत रोमान्स करायची इच्छा असल्याचे तिने सांगितले. पण ती असे का म्हणाली यामागचे कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

दिशा सध्या तिच्या एक व्हिलन रिटर्न्स या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात दिशा नकारात्मक पात्र साकारत असली तरी प्रेक्षकांना तिची भूमिका आवडली आहे. एका मुलाखतीत दिशाने तिच्या चित्रपटातील व्यक्तिरेखेबद्दल सांगितले, तसेच यावेळी तिने आपल्याहून कमी आणि जास्त वयाच्या मुलांसोबत रोमान्स करण्याचा अनुभव देखील सांगितला.

‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल दिशा म्हणाली की, ही खलनायिका मोहित सुरी सरांनी माझ्याकडून करुन घेतली. थ्रिलर चित्रपट माझ्या आवडीचे आहेत. मी लहानपणापासून अशा प्रकारचे चित्रपट बघत मोठी झाली आहे. मला आधीपासून असे वेगळे पात्र साकारायचे होते. जे मला या चित्रपटात साकारायला मिळाले. हे एक अतिशय वेगळे पात्र आहे. या पात्राची अशी मानसिकता आहे की लोभ चांगला असतो. आणि त्यासाठी ती काहीही करु शकते. तिच्या सौंदर्याचा वापर ती मुलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी करते.

‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात दिशाने अभिनेता जॉन अब्राहम सोबत रोमान्स केला आहे. या चित्रपटात दिशाचे जॉनसोबत काही इंटिमेट सीनही आहेत. याबाबत दिशाला विचारले असता ती म्हणाली, ”सुरुवातीला मी खूप नर्व्हस होते, पण जॉन सर खूप प्रेमळ व्यक्ती आहेत. ते खूप काळजी घेतात, सर्वांशी प्रेमाने बोलतात. त्यांच्या धूम चित्रपटापासून मी त्यांची खूप मोठी चाहती आहे. त्यामुळे त्याच्यासोबत काम करणे माझ्यासाठी खूप खास होते. अशा सीन्सवेळी एक सहकलाकार म्हणून ते समोरच्या कलाकारला खूप समजून घेतात.

आपल्याहून मोठ्या कलाकारांसोबत रोमान्स करण्याच्या अनुभवाबद्दल दिशाने सांगितले की, जर ती त्या पात्राची गरज असेल तर मला ते करायला काहीच हरकत नाही. पण मला असे वाटते की, जर मुलं त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलींसोबत काम करू शकत असतील, तर मुलींसोबतही असेच व्हायला हवे. त्यांनाही त्यांच्याहून वयाने लहान असलेल्या मुलांसोबत काम करता आलं पाहिजे. आणि जर प्रेक्षक हे बघायला तयार असतील तर हा बदल आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल कारण काही झालं तरी प्रेक्षक हे आपले माय-बाप आहेत.