गर्द निळा शर्ट आणि रिप्ड डेनिम शॉर्ट्स घालून दि...

गर्द निळा शर्ट आणि रिप्ड डेनिम शॉर्ट्स घालून दिशा परमार दिसतेय् इतकी हॉट की, चाहते म्हणतात – हा तर बॉम्ब आहे! (Disha Parmar Looks Super Hot In Her New Pictures)

साधीभोळी दिसणारी दिशा परमार, अशा रुपात लोकांसमोर प्रकट झाली, तरी लोकांना ती आवडली. इन्स्टाग्रामवर तिनं आपले मॉडर्न फोटो प्रकाशित केले, त्यात मी दिसतेय्‌ भारीच हॉट!

दिशाने गर्द निळा, सॅटिनचा शर्ट घातला आहे. अन्‌ रिप्ड डेनिम शॉर्ट्स घातले आहेत. तिनं केस मोकळे सोडले आहेत. अन्‌ गळ्यात भारदस्त सोन्याचे नेकलेस घातले आहे. तिच्या या रुपाची चाहते भारीच तारीफ करत आहेत.

चाहते तिला हॉट, क्युट, फायर आणि बॉम्ब अशा उपमा देत सुटले आहेत. काहींनी असंही म्हटलं आहे की, बाई गं, तू आपली साडीच नेसत जा! त्यात तू खूप छान दिसतेस… ‘बडे अच्छे लगते है २’ या मालिकेतील प्रियाचे रुप त्यांच्या डोळ्यात ठसले आहे, त्यामुळे त्यांना तसे वाटणे स्वाभाविक आहे.

दिशाने काल, आपला नवरा राहुल वैद्य याच्यासोबत पारंपरिक वेशभूषेत गुढीपाडवा साजरा केला. तेव्हाचे दिशाचे मराठी लूक लोकांना खूपच आवडले. तू इतकी सुंदर दिसतेस की, नजर हटत नाही; असं काही जण म्हणाले. दुसऱ्या एकाने तिला किलर म्हटले. तुमच्या या जोडीला कोणाचीही दृष्ट लागू नये, असंही काही जण म्हणाले. दिशाने मराठीत मजकूर लिहून सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

यावरून हे लक्षात येतं की, दिशा कोण्त्याही लूकमध्ये छान दिसते.