सलमान खानला बघताच दिग्दर्शकाने दिला होता नकार, ...

सलमान खानला बघताच दिग्दर्शकाने दिला होता नकार, पुढे असा मिळाला पहिला चित्रपट (Director Rejected Salman Khan During Audition, Know How He Got His First Film as a Hero)

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा चाहतावर्ग भारतासोबतच जगाच्या कानाकोपऱ्यात पसरला आहे. सलमानचे चाहते केवळ त्याच्या चित्रपटांचीच नव्हे तर तो कोणत्या चित्रपटात पाहुणा कलाकार दिसणार असेल तर त्या चित्रपटाची देखील आतुरतेने वाट पाहत असतात. सलमान खानने आपल्या मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत हे स्थान निर्माण केले आहे. मात्र, त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यालाही सर्वसामान्यांप्रमाणेच खूप संघर्ष करावा लागला होता. नायक म्हणून जेव्हा तो पहिल्या चित्रपटासाठी ऑडिशनला गेला होता तेव्हा दिग्दर्शकाने त्याला पाहताच नकार दिला.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटातील सलमान खानच्या कॅमिओ एंट्रीवर चाहत्यांनी जोरदार शिट्ट्या वाजवल्या. त्यावरुनच त्याची लोकप्रियता स्पष्ट होते. पण त्याच्या करीअरच्या सुरुवातीला चित्र काहीसे वेगळे होते.

सलमान खान मुख्य भूमिकेसाठी ऑडिशनला गेला असता. त्याला पाहिल्यावर लगेचच एका दिग्दर्शकाने त्याला नकार दिला होता. जेव्हा सलमान खान ‘मैंने प्यार किया’ चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेला असताना, त्याला रिसेप्शनमध्ये पाहूनच दिग्दर्शकाने नकार दिला होता. अशा परिस्थितीत या चित्रपटात भूमिका मिळणे त्याच्यासाठी सोपे नव्हते.

दिग्दर्शक सूरज बडजात्याच्या या चित्रपटासाठी सलमान खानने ऑडिशन दिले, पण पहिल्या नजरेत त्यांना तो आवडला नाही. चित्रपटातील नायकाच्या भूमिकेसाठी सलमान खान खूपच तरुण दिसत असल्याचे दिग्दर्शकाला वाटले. सूरज बडजात्या यांनी एकाद सांगितले होते की, जेव्हा सलमान खान पहिल्यांदा माझ्या ऑफिसमध्ये आला तेव्हा तो खूपच तरुण दिसत होता.

असे म्हटले जाते की पहिल्या ऑडिशनमध्ये नाकारल्यानंतर, जेव्हा सलमानची दुसरी ऑडिशन झाली तेव्हा त्याची मुख्य अभिनेता म्हणून निवड झाली. दुसऱ्या ऑडिशनमध्ये दिग्दर्शकाने सलमानला पसंत करून फायनल केले. असे म्हटले जाते की त्या काळात सलमान खान खूप बारीक होता, त्यामुळे वजन वाढवण्यासाठी तो सेटवर भरपूर केळी आणि 30-30 चपात्या खात असे.

मुख्य नायक म्हणून सलमानचा पहिला चित्रपट ‘मैने प्यार किया’ हा सुपरहिट ठरला. 1989 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटासाठी सलमान खानला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट नवोदित पुरुष अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला होता. सलमानने 1988 मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यात त्याने सदाबहार अभिनेत्री रेखाच्या भावाची भूमिका साकारली होती.