तारक मेहता….च्या दिग्दर्शकाचा मालिकेला तब...

तारक मेहता….च्या दिग्दर्शकाचा मालिकेला तब्बल 14 वर्षांनी रामराम(Director Of ‘Tarak Mehta Ka Oolta Chashma’ makes A Good Bye To The Serial After 14 Years)

टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात हिट शो म्हणून तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेला ओळखले जाते. गेली 14 वर्षे ही मालिका अविरत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या 14 वर्षांत मालिकेत बरेच बदल झाले. काही कलाकार सोडून गेले तर काही कलाकारांची एण्ट्री झाली. पण प्रेक्षकांचे मालिकेवरील प्रेम काही कमी झाले नाही. मालिकेत गेली 4 वर्षे दयाबेन हे प्रमुख पात्र दिसत नाहीय. मात्र तरीही त्या पात्राचा उल्लेख करुन ही मालिका अजूनही यशस्वीरित्या चालूच आहे.

तारक मेहता.. या मालिकेमुळे त्यातील कलाकारांना बरीच प्रसिद्धी मिळाली. तर काही कलाकारांचे वादही झाले. त्यामुळे ते मालिकेतून बाहेर पडले. या मालिकेतील दयाबेन म्हणजेच दिशा वकानी आणि तारक मेहता हे पात्र साकारणारे अभिनेता शैलेश लोढा हे आपापल्या वैयक्तिक कारणांमुळे मालिकेबाहेर पडले आहेत. आता या मालिकेच्या सेटवरुन नवी बातमी समोर आली आहे.

मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदा यांनी तब्बल 14 वर्षांनंतर ही मालिका सोडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 15 डिसेंबरला त्यांनी मालिकेचा आपला शेवटचा भाग दिग्दर्शित केला होता. मालव व मालिकेच्या निर्मात्यांचे वाद झाल्यामुळे त्यांनी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

एका मुलाखतीत मालव राजदा यांनी सांगितले की,  “१४ वर्ष ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेचं मी दिग्दर्शन केलं. त्यामुळे मी कंम्फर्ट झोनमध्ये गेलो होतो. या मालिकेने मला खूप काही दिलं आहे. प्रसिद्धी, पैसा याबरोबरच माझी धर्मपत्नीही मला याच मालिकेमुळे मिळाली. निर्मात्यांबरोबर वाद झाल्याने मी मालिका सोडली”.