दीपिका कक्क़रला खोटे गरोदरपण आणि रिलेशनबद्दल हि...

दीपिका कक्क़रला खोटे गरोदरपण आणि रिलेशनबद्दल हिणावणाऱ्या ट्रोलर्सना अभिनेत्रीने दिले सडेतोड उत्तर (Dipika Kakar gives a befitting reply to trolls for calling her pregnancy drama and fake, slams trolls for spreading Negativity)

दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम हे दोघे लग्नाच्या पाच वर्षानंतर आईबाबा होणार आहेत. दीपिका तिच्या व्लॉग्समध्ये गरोदरपणाबद्दल अनेकदा बोलताना दिसते आणि नवरा शोएब गरोदरपणात आपली कशी काळजी घेतो हे देखील सांगते. दीपिकाच्या चाहत्यांना तिच्या व्लॉग्सद्वारे तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडते. पण दुसरीकडे, दीपिका अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर येते. आता ट्रोलर्सनी तिच्या गरोदरपणाबद्दल नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. काही युजर्सचे म्हणणे आहे की ती खोटो बेबी बंप दाखवत आहे, अशा कमेंट वाचून दीपिकाचा चढला आणि तिने तिच्या नवीन व्लॉगमध्ये त्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तरही दिले.

व्लॉगद्वारे दीपिकाने नकारात्मकता पसरवणाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत. व्लॉगच्या सुरुवातीलाच ती म्हणते, “और कितनी नकारात्मकता असफल हो जाएगी. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. गर्भधारणा असो, आनंद साजरा करणे, कौटुंबिक किंवा पती-पत्नीचे नाते असो, तुम्हाला सर्वत्र नकारात्मक कमेंट्स कराव्या लागतात. दीपिकाने त्या लोकांवरही टीका केली जे तिला गर्भधारणा खोटे असल्याचे म्हणत खोटा बेबी बंप लावल्याचे म्हणत आहेत.“हे असे लोक आहेत जे त्यांच्या आयुष्यात सुखी नाहीत किंवा काहीही मिळवले नाहीत. आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यावर अशा कमेंट करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी हे सांगत आहे.

दीपिकाने सांगितले की, अलीकडेच तिच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस होता, त्यामुळे लोकांनी तिच्या जोडीदाराबद्दल वाईट कमेंट्स केल्या. लोकांनी सांगितले की, शोएबने वाढदिवस का साजरा केला नाही, त्याने वाढदिवसाचे नियोजन करायला हवे होते. यावर दीपिका म्हणाली “कोण म्हणतं की फक्त पुरुषांनीच सर्व काही साजरे करायला हवे. आपण स्त्रिया आपल्या नवऱ्याला विशेष वाटावे म्हणून काही करु शकत नाही का? जेव्हा तो त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून मला विशेष वाटावे यासाठी प्रयत्न करतो , तेव्हा मी का नाही करू शकत? जर मला शक्य असेल तर मी त्याच्यासाठी हे रोज करेन. इतकं माझं त्याच्यावर प्रेम आहे.

दीपिकाने पती-पत्नीच्या नातेसंबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या ट्रोलर्सचाही खरपूस समाचार घेतला, “होय मला शोएबचे वेड आहे. आम्हा दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. शोएब हा माझा अभिमान आहे.”

दीपिकाने तिच्या आणि शोएबबद्दल केलेल्या काही कमेंट्सही अनेकदा वाचल्या आणि त्यामुळे ती दुखावली गेली. तसेच त्या कमेंटला उत्तर दिले. एकाने म्हटले होते की, कधी त्याची तब्येत बिघडते, मग तो बरा होतो, मग तो खरेदी करायला लागतो. तब्येत आहे की गिरगिट. दीपिकाने त्या लोकांवरही टीका केली जे तिला तिच्या पहिल्या लग्नासाठी ट्रोल करतात. यासोबतच दीपिकाने त्या चाहत्यांचेही आभार मानले आहेत जे तिला पाठिंबा करतात.

शेवटी तिने ट्रोल करणाऱ्यांना सांगितले आहे की, आम्ही जरी कलाकार असलो तरी एक सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा आहोत, या सर्व गोष्टी आम्हालाही खटकतात. नकारात्मकतेमुळे आम्हीही अस्वस्थ होतो. “कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यात दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तिचा नवरा आणि तिचे मूल. आणि माझ्या बाबतीत, माझ्या आयुष्यातील या दोन महत्त्वाच्या भागांबद्दल सर्वत्र नकारात्मकता पसरवली जात आहे, ज्याचा माझ्यावर खूप परिणाम होत आहे. दीपिकाला अशाप्रकारे ट्रोलचा राग येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिचा राग ट्रोलवर निघाला आहे.