दिलीप कुमार हॉस्पिटलात! (Dilipkumar Hospitalise...

दिलीप कुमार हॉस्पिटलात! (Dilipkumar Hospitalised Today Morning)

ज्येष्ठ अभिनेता दिलीपकुमार यांना आज सकाळी मुंबई उपनगरातील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, असे त्यांच्या पत्नी सायरा बानू यांनी सांगितले. दिलीपसाहेब ९८ वर्षांचे असून सतत आजारी आहोत. आज सकाळी त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने हॉस्पिटलात भर्ती करण्यात आले आहे.

गेल्याच महिन्यात, याच हॉस्पिटलात दिलीपकुमार यांना नियमित चाचण्या करण्यासाठी नेण्यात आले होते. दिलीपकुमार यांनी १९४४ साली चित्रसृष्टीत प्रवेश केला होता. त्यांचा ‘किला’ हा अखेरचा चित्रपट १९९८ साली प्रदर्शित झाला होता.