दिलीपकुमारच्या तब्येतीत सुध...

दिलीपकुमारच्या तब्येतीत सुधारणा : आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता (Dilip kumar Stable Now : Likely To Be Discharged Today)

दि. ६ जून रोजी मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलात भर्ती करण्यात आलेल्या ज्येष्ठ अभिनेता दिलीपकुमार यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांचे निकटवर्तीय, त्यांच्या तब्येतीबाबत ताज्या बातम्या त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर करत आहेत. त्यातून अशी माहिती मिळाली आहे की, दिलीपकुमार यांना प्लुरल ॲस्पिरेशन प्रोसिजर मधून जावे लागत आहे. त्यामध्ये फुप्फुस आणि छाती यांच्या पडद्यामध्ये एक छोटी सुई किंवा नळी घातली जाते. त्यातून फुप्फुसाच्या आसपास जमा झालेला द्रव पदार्थ किंवा कफ साफ केला जातो. त्यांची ही प्रक्रिया यशस्वी झाली आहे.

दिलीपकुमार यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. जलील पारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या डाव्या फुप्फुसामध्ये गोळा झालेले ३५० मिलीलीटर द्रवपदार्थ काढण्यात आले असून त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी १०० टक्के आहे. दिलीपकुमार यांना हॉस्पिटलात दाखल केल्यावर तपासणी केल्यानंतर, त्यांच्या फुप्फुसात द्रव जमा झाल्याचे लक्षात आले होते.

फोटो सौजन्य : ट्‌विटर

दिलीपकुमार यांचा ट्वीटर अकाऊंट हाताळणाऱ्या फैसल फारुखी या त्यांच्या निकटवर्तीयांनी ही माहिती प्रकट केली. त्यांनी म्हटलं आहे की, ”तुम्हा सर्वांनी केलेल्या प्रार्थनांबद्दल धन्यवाद. दिलीपसाहेबांचा उपचार यशस्वी झाला आहे. डॉ. जलील पारकर व डॉ. नितीन गोखले यांच्याशी मी व्यक्तीशः ही माहिती मिळवली आहे. आज त्यांना डिस्चार्ज दिला जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.”