नट्टू काकांच्या आठवणीत जेठालाल भावूक…. त्...

नट्टू काकांच्या आठवणीत जेठालाल भावूक…. त्यांची खूप आठवण येतेय (Dilip Joshi Aka Jethalal Remembers Ghanshyam Nayak Aka Nattu Kaka, Says ‘Bahut Miss Kar Rahe…’)

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या १२ वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कालावधीत मालिकेत व त्यातल्या कलाकरांमध्ये अनेक बदल झाले. तरीही टीआरपीच्या स्पर्धेत ही मालिका अव्वल स्थानी असते. या मालिकेतील बऱ्याच पात्रांनी ही मालिका सोडली तर काहींचे निधन झाले. पण असे असले तरी प्रेक्षकांच्या मनात ते कायम आहेत. काही दिवसांपूर्वीच नट्टू काका हे पात्र साकारणाऱ्या घनश्याम नायक या पात्राचे कॅन्सरच्या आजारामुळे निधन झाले. पण नट्टू काका या भूमिकेमुळे ते अजरामर झाले.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही टीव्ही इंडस्ट्रीमधील एक अशी मालिका आहे जिच्या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. त्यातीलच एक पात्र म्हणजे नट्टू काका. हे पात्र घनश्याम नायक यांनी साकारले होते. पण त्यांच्या निधनामुळे मालिकेतील कलाकारांसोबतच त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला होता. या मालिकेत नट्टू काका जेठालालच्या गडा इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करायचे. चाहत्यांना जेठालाल व नट्टू काकांची केमिस्ट्री खूप आवडायची.

या मालिकेच्या पुढील भागांसाठी नवीन गडा इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान उघडले आहे.या दुकानाचे उद्घाटन मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांच्या हस्ते झाले. पण दुकान उघडल्यावर जेठालालला सर्वात आधी नट्टू काकांची कमी जाणवली.

विरल भयानी या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओत जेठालाल नट्टू काकांची आठवण काढताना दिसतो.

या व्हिडिओत दिलीप जोशी म्हणतात की, घनश्याम भाई… नट्टू काका आपल्यात नाहीत. या नव्या दुकानात त्यांची खूप आठवण येत आहे. पण मला विश्वास आहे ते जिथे कुठे असतील तिथून आपल्याला आशीर्वाद देत असतील.