खरंच अनुषा दांडेकरने मुलगी दत्तक घेतली ? अनुषाव...

खरंच अनुषा दांडेकरने मुलगी दत्तक घेतली ? अनुषावर होतोय शुभेच्छांचा वर्षाव! काय आहे या पोस्टमागचं सत्य? (Did Anusha Dandekar Adopt A Baby Girl? Anusha Reacts And Clarifies To Adoption Rumours)

काल ३ जून २०२२ रोजी एक पोस्ट प्रचंड वेगाने व्हायरल झाली आहे, ज्यात टीव्ही सेलिब्रिटी आणि व्हीजे अनुषा दांडेकर (Anusha Dandekar) ने इन्स्टाग्रामवर एका लहान मुलीचे फोटो शेअर केले आहेत. सोबतच आपण या गोंडस लेकीची आई असल्याचं म्हटलं आहे. मुलीचे फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

एरव्हीही सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग असणारी अनुषा दांडेकर तिच्या व्यावसायिक जीवनाबरोबरच तिच्या व्यक्तिगत जीवनासाठीही बरेचदा चर्चेत असते. अनुषा बिग बॉस १५ फेम करण कुंद्राची एक्स गर्लफ्रेंड (Ex Girlfriend) असून बाळासोबतची तिची ही नवी पोस्ट सध्या सोशल मीडियावर भलतीच चर्चेत आहे.

अनुषा दांडेकरने तिच्या ‘बेबी गर्ल’ सहाराचे फोटो शेअर केले आहेत. पोस्टमध्ये तिने लिहिलंय, ‘शेवटी माझ्याकडे एक लहान मुलगी आहे. तिला मी माझी म्हणू शकते. माझी अँजेल सहारा, माझ्या आयुष्यातील खरं प्रेम. माझ्या बाळा मी कायम तुझी काळजी घेईन, तुझे रक्षण करीन. तुला खूप खूप प्रेम.”

अनुषा फोटोंमध्ये फारच आनंदी दिसत आहे. या फोटोंमध्ये ती आपल्या लेकीसोबत मजामस्ती करताना दिसून येत आहे.

अनुषाची ही पोस्ट बघून सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी अनुषाचं अभिनंदन केलं आहे. तर अनेकांनी अनुषाने बाळ दत्तक घेतल्याचा अंदाज लावलाय. तिची ही पोस्ट बघून सोशल मीडियावर मात्र निरनिराळ्या चर्चांना उधाण आले आहे. अनुषाचे हे फोटो पाहून नेटकरी प्रचंड कमेंट्स करत आहेत. सोबतच अभिनेत्रीला तुम्ही या मुलीला दत्तक घेतलं का? की सरोगसीने झाली आहे असे प्रश्न विचारत आहेत.

अनुषाची बहिण शिबानीनेही या पोस्टवर एक कमेंट केली, ज्यामुळे सगळ्यांचाच गोंधळ झाला… शिबानीने लिहिले – इतरांची मुले चोरणे आणि त्यांचे फोटो काढणे थांबव… पण ही खूप सुंदर मुलगी आहे… यावर अनुषाने हसून उत्तर दिलं की, ती तिची गॉड मदर आहे. मला तिला चोरण्याची काहीच गरज नाही.

आपल्या बहिणीप्रमाणेच चाहतेही पोस्ट पाहून गोंधळलेले असल्याचे लक्षात आल्यानंतर अनुषाने एक पोस्ट टाकून तिला शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत आणि ती माझी गॉड डॉटर आहे, त्यामुळे मी तिला आपली म्हणू शकते, असे लिहिले आहे.

तरीही बऱ्याच जणांचा संभ्रम कमी झाला नाही, तेव्हा अनुषाने आणखी एक पोस्ट टाकली ज्यात बेबी सहारा, सहाराची आई आणि आजीसोबत होती. अनुषाने सर्वांची ओळख करून दिली आणि लिहिले की, बेबी सहाराची खरी आई झोहा आणि आजी संगीता आंटी… मी गॉड मदर आहे याचा अर्थ जेव्हा जेव्हा माझ्या जिवलग सहाराला माझी गरज भासेल, तेव्हा मी तिची काळजी घेण्यास वचनबद्ध असणार… नेहमी. आणि म्हणूनच ती माझ्या मुलीसारखी आहे, पण ती माझी खरी मुलगी नाही! आता अनुषाने सगळे संभ्रम स्वतःच दूर केले आहेत. तेव्हा तिने मुलीला दत्तक घेतले नसून ती तिची गॉड मदर कशी आहे, हे सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल.