पुरुषांच्या इंद्रियावर कमेंट करून दिया मिर्झाने...

पुरुषांच्या इंद्रियावर कमेंट करून दिया मिर्झाने माजवली खळबळ… (Dia Mirza’s Comment On Mens Private Part; People Surprised By Tweet)

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झा, मालदीवच्या बेटांवर आपला नवरा वैभव रेखी सोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली आहे. तिथून तिने एक अजब-गजब ट्वीट प्रसिद्ध करून चाहत्यांमध्ये खळबळ माजवली आहे. तिनं केलेलं हे ट्वीट लगेच व्हायरल झालं असून त्यामध्ये पुरुषांच्या इंद्रियावर कमेन्ट करून वादळ उठविले आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

दिया मिर्झाचं हे वादळी विधान एका रिपोर्टवर आधारित आहे. त्यानुसार वातावरणामध्ये जे जहरी वायू पसरले आहेत, त्यांचा पुरुषांचे शुक्राणू आणि वृषणावर परिणाम होत आहे. वातावरणातील या भयंकर प्रदुषणामुळे पुरुषांच्या इंद्रियाचा आकार लहान होत आहे, असं तिनं म्हटलं आहे.
हया रिपोर्टला टॅग करून दिया लिहिते, “आता लोक पर्यावरणाबाबत जागरूक होतील. अन्‌ कदाचित दूषित पर्यावरण आणि वायू प्रदुषणाच्या बाबतीत जग अधिक गंभीरपणे बघेल.” दियाच्या या ट्वीटवर लोक खूपच कमेंट्‌स करत आहेत.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम
१५ फेब्रुवारीला दिया मिर्झाने बिझनेसमन वैभव रेखीशी लग्न केलं होतं. त्यानंतर आता उशिराने ते दोघे मालदीवच्या बेटांवर हनीमूनसाठी आले आहेत. पण ही सुट्टी मजेत घालवायचं सोडून पर्यावरणाबाबत जागरूक असणारी दिया पुरुषांच्या गुप्तांगावर ट्वीट करून लक्ष वेधून घेत आहे.

हिना खानला शोभून दिसते बिकिनी, ती दिसतेय् खूपच सुंदर (Wow! Hina Khan Looks Drop Dead Gorgeous In Printed Bikini Set, See Pictures)