लग्नानंतर फक्त दीड महिन्यातच दिया मिर्झाने दिली...

लग्नानंतर फक्त दीड महिन्यातच दिया मिर्झाने दिली ‘गुड न्यूज’; केले बेबी बंपचे प्रदर्शन (Dia Mirza Announces Pregnancy After One-And-Half Month Of Marriage, Flaunts Baby Bump!)

दिया मिर्झा सध्या आपला नवरा वैभव रेखीसोबत मालदीवमध्ये हनीमून साजरा करत आहे. तिथून तिने आपली ‘गुड न्यूज’ शेअर केली आहे. आपण आई होणार असल्याची गोड बातमी खुद्द तिनेच प्रसारित केली आहे.

मधुचंद्राच्या ठिकाणी गोड बातमी

मालदीवच्या बेटावरून दियाने आपला अतिशय सुंदर फोटो प्रसिद्ध करून आपल्याला दिवस गेल्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये ती आपले फुगलेले पोट दाखवते आहे. त्यासोबत तिने काही छान ओळी लिहिल्या आहेत.

”मदर अर्थ के साथ… एक ऐसी लाईफ फोर्स के साथ जो सभी का प्रारंभ है… सर्व गोष्टींचा, अंगाई गीतांचा, नव्या बीजाचा… नव्या आशेचा… आपल्या गर्भात या सर्व विशुद्ध स्वप्नांना सामावू शकले, याबद्दल मी देवाची अत्यंत आभारी आहे.” दियाने आपल्या गर्भारपणाची बातमी देताच बॉलिवूड कलाकार तिचे अभिनंदन करत आहेत. अनुष्का शर्मा, मलायका अरोरा, बिपाशा बसू, प्रियंका चोप्रा, शिल्पा शेट्टी यांनी तिला अभिनंदनपर संदेश पाठविले आहेत.

मधुचंद्र साजरा करण्यासाठी दिया गेली आहे…

लग्नानंतर दीड महिन्यांनी दिया पतीसोबत मधुचंद्र साजरा करण्यासाठी गेली आहे. पती आणि त्याच्या मुलीसोबत ती मालदीवमध्ये मौजमजा करते आहे. आपल्या सावत्र मुलीसोबत घेतलेले फोटो दियाने शेअर केले तेव्हा तिच्या उदार मनाचे कौतुक झालेले दिसले. तिथूनच दियाने आपण गर्भार असल्याचे जगजाहीर केले. लग्नानंतर केवळ दीड महिन्यातच ही खुश खबर दिल्याने लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
अलिकडेच दियाचे दुसरे लग्न झाले

याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात दियाने आपला बॉयफ्रेंड वैभव रेखीशी अचानक लग्न केले. लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते. दिया व वैभव यांचे हे दुसरे लग्न आहे. वैभवला आधीच्या बायकोपासून एक मुलगी झालेली आहे, तर दिया ही पहिल्यांदाच आई होणार आहे.