‘धर्मवीर’चे दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांची ...

‘धर्मवीर’चे दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांची बायको आहे ७ घरांची मालकीण: तरडेंनी तिला दिल्या या अनोख्या गिफ्टस् (‘Dharmveer’ Fame Director Pravin Tarde Gifted 7 Flats To His Wife On Her Birthdays)

‘धर्मवीर’ या सुपरहिट मराठी चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’ हा दुसरा चित्रपट देखील यशस्वी ठरला आहे. या चित्रपटात हंबीररावांची भूमिका स्वतः तरडे यांनी केली आहे.

दोन्ही चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शने तरडे यांनी केलं आहे. पण ते अभिनेता म्हणून मराठी सिनेमात आले. या कलाकाराने ईर्षेपोटी एक अनोखा विक्रम केला आहे. त्यांनी आपल्या पत्नीला आजपावेतो ७ फ्लॅट्‌स भेट दिले आहेत. त्यांच्या लग्नाच्या दर वाढदिवसाला एक असे सलग ७ वर्षे त्यांनी ७ फ्लॅट्‌स तिला गिफ्ट दिले आहेत.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्वतःहून हे गुपित उघड केलं आहे. प्रवीण यांची पत्नी स्नेहल तरडे यांनी ‘धर्मवीर’ मध्ये एक तडफदार भूमिका देखील केली आहे. या फ्लॅट्‌स-भेटींबद्दल प्रवीण तरडेंनी सांगितलं की, आम्ही छोट्याशा घरात राहायचो. १० बाय दहाच्या खोलीत राहायचो तेव्हा स्नेहलचे नातेवाईक तिला या परिस्थितीवरून टोमणे मारायचे. तेव्हा ईर्षेने मी तिला शब्द दिला. सिनेमात यश मिळाल्यानंतर ७ वर्षे तिला ७ फ्लॅट गिफ्ट दिले.

स्नेहल तरडे या उत्कृष्ट अभिनेत्री आहेत. ‘धर्मवीर’ मध्ये त्यांनी बिरजे बाईंची तर ‘हंबीरराव’मध्ये लक्ष्मीबाईंची भूमिका साकारली आहे.