धर्मेंदजींची कोरोना चाचणी नकारात्मक; मानले देवा...

धर्मेंदजींची कोरोना चाचणी नकारात्मक; मानले देवाचे आभार (Dharmendra on his COVID Test: “Thank God I’ve tested negative”)

देओल यांच्या घरातील कर्मचाऱ्यांपैकी तीन व्यक्तींची कोरोनाची चाचणी सकारात्मक आल्याचे वृत्त समजल्यानंतर धर्मेंद्रजींनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वतःची कोरोनाची चाचणी करून घेतली होती. त्यांची ही चाचणी नकारात्मक आल्याने धर्मेंद्रजींना तसेच त्यांच्या कुटुंबियांना हायसे वाटले आहे.
कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींमुळे कुटुंबातील इतर कोणत्याही व्यक्तीस त्यांचा संसर्ग होऊ नये याबाबत धर्मेंद्रजींनी स्वतः त्यांची वेगळी सोय केली आहे. असे सुत्रांनुसार कळते.

सदर बातमीच्या अनुषंगाने धर्मेंदजींशी संपर्क साधला असता ते म्हणाले,” देव माझ्याबाबत अतिशय दयाळू आहे. माझी कोरोना चाचणी नकारात्मक आली. कोरोनाची ही दुसरी लाट काय करेल, मला खरोखर माहीत नाही. परंतु ही परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात आणली पाहिजे, अन्यथा गोष्टी खरोखरच हाताबाहेर जात आहेत.”

चाळीशी गाठलेल्या श्वेता तिवारीने दाखवला जवानीचा जलवा