धर्मा प्रोडक्शनने लॉन्च केलं म्हणून लोकांना मी ...

धर्मा प्रोडक्शनने लॉन्च केलं म्हणून लोकांना मी आवडत नाही, जान्हवी कपूरने व्यक्त केली खंत (Dharma Production Has Launched Me, That’s Why I Get Hate, Know Why Janhvi Kapoor Think So)

जान्हवी कपूरने 2018 मध्ये ‘धडक’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. धडक हा ‘सैराट’ या मराठी ब्लॉकबस्टर चित्रपटाचा हा हिंदी रिमेक होता. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत हा चित्रपट बनवण्यात आला होता. यानंतरही जान्हवीने करण जोहर निर्मित अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यामुळे जान्हवीला अनेक टीकांना सामोरे जावे लागले.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीने सांगितले की,  मला धर्मा प्रोडक्शनने लॉन्च केल्यामुळे प्रेक्षकांच्या द्वेषाचा सामना करावा लागतो. अनेकांच्या मते, मी बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी असल्याने माझ्यासाठी चित्रपटांमध्ये प्रवेश करणे खूप सोपे होते. नवोदितांना अशा मोठ्या प्रॉडक्शन हाऊसच्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळत नाही,पण मला माझ्या पालकांमुळे ही संधी सहज मिळाली. जान्हवी पुढे म्हणाली की, “मी लोकांच्या सतत निशाण्यावर असते आणि याच गोष्टीमुळे मला खूप दडपण येते.”

 जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ‘बवाल’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच ती मिस्टर अॅण्ड मिसेस माहीमध्येही दिसणार आहे.

जान्हवीने आपले शालेय शिक्षण मुंबईतूनच पूर्ण केले होते. त्यानंतर तिने कॅलिफोर्नियातील एका संस्थेतून अभिनयाचा कोर्स केला आणि मुंबईत आल्यानंतर चित्रपटांमध्ये करीअर केले. जान्हवी आपल्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यासाठीही खूप चर्चेत असते. जान्हवीचे नाव अक्षत रंजन, ईशान खट्टर, शिखर पहाडिया आणि कार्तिक आर्यन यांच्यासोबतही जोडले गेले आहे.

चित्रपटांव्यतिरिक्त जान्हवी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती दररोज आपले व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिला 20 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.