आनंद दिघे यांच्या फोटोस अभिषेक करून ‘धर्मविर’ च...

आनंद दिघे यांच्या फोटोस अभिषेक करून ‘धर्मविर’ च्या खेळास प्रारंभ (‘Dharamveer’ Show Opens With The Coronation Of Anand Dighe’s Cutout)

धर्मवीर आनंद दिघे (Dharamveer आनंद दिघे) यांची कर्मभूमी असलेल्या ठाणे शहरात, त्यांचे जीवनचरित्र चितारणाऱ्या ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ या मराठी चित्रपटाच्या शुभारंभाचा खेळ भक्तीभावाने सुरू करण्यात आला. राज्याचे कॅबिनेट मंत्री व आनंद दिघे यांचे शिष्योत्तम असलेले मा. एकनाथ शिंदे यांनी दिघे यांच्या भव्य कटाऊटवर दुधाचा अभिषेक करून सदर चित्रपटाच्या खेळाचा शुभारंभ केला.

Dharamveer

ठाण्याच्या चित्रपटगृहात झालेल्या या समारंभास ‘धर्मवीर’ चित्रपटाचे कलावंत -तंत्रज्ञ तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dharamveer

चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओक या अभिनेत्याने देखील दिघे यांच्या कटाऊटला दुधाचा अभिषेक घातला. याप्रसंगी पुजेचे आयोजन देखील करण्यात आले होते,
साहिल मोशन आर्ट्सचे निर्माते मंगेश देसाई व झी स्टुडिओज यांची प्रस्तुती असलेल्या ‘धर्मवीर’ ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन प्रवीण विठ्ठल तरडे यांनी केलं आहे.

Dharamveer