अभिनेता धनुष याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस...

अभिनेता धनुष याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ; गीतकार प्रसून जोशी यांचाही गौरव, इफ्फीच्या समारोपात झाले कौतुक (Dhanush Bags Best Actor Award; Lyricist Prasoon Joshi Also Honoured)

गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला. त्यामध्ये दाक्षिणात्य अभिनेता धनुष याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ‘असुरन’ या चित्रपटासाठी त्याचा हा गौरव झाला. या चित्रपटात धनुषने शेतकरी पिता-पुत्र अशी दुहेरी भूमिका केली आहे. समाजातल्या जुन्या सरंजामशाही व्यवस्थेच्या विरोधात हा रांगडा शेतकरी उभा राहतो. त्याच्या या भूमिकेचे महोत्सवात खूप कौतुक झाले.

‘ऑन व्हील्स’ या चित्रपटातील भूमिकेसाठी ब्राझीलची अभिनेत्री लारा बोल्डोरिनी हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींचे पारितोषिक देण्यात आले.
सुप्रसिध्द गीतकार प्रसून जोशी यांना ‘फिल्म पर्सनॅलिटी ऑफ थे इयर’ हा सन्मान देण्यात आला. प्रसून जोशी यांनी ‘लज्जा’ या चित्रपटाद्वारे गीतकार म्हणून चित्रसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर ‘तारे जमीन पर’, ‘रंग दे बसंती’ ‘भाग मिल्खा भाग’, ‘नीरजा’, ‘मणिकर्णिका’ इत्यादी चित्रपटाची गीते त्यांनी लिहिली.

केन्द्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर, खासदार सुमालता आणि राहुल रवैल यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार वितरीत करण्यात आले.
-नंदकिशोर धुरंधर