देवों के देव महादेव फेम मोहित रैनाच्या घरी हलला...
देवों के देव महादेव फेम मोहित रैनाच्या घरी हलला पाळणा, अभिनेत्याच्या पत्नीने दिला मुलीला जन्म(Devon Ke Dev Mahadev fame Mohit Raina, Wife Aditi Blessed With Baby Girl, shares pic: ‘We became 3’, see FIRST photo)

देवों के देव महादेव फेम मोहित रैना हा टीव्हीवरील एक लोकप्रिय चेहरा आहे. सोशल मीडियावर त्याचे खूप मोठे चाहते आहेत. मोहितने आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. मोहित रैना बाबा झाला आहे. या अभिनेत्याने सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.

मोहित रैनाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक गोड फोटो शेअर केला, ज्यामध्ये मोहित आणि त्याची पत्नी आदिती शर्माने आपल्या नवजात बाळाचे बोट धरले आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आणि मग असेच आम्ही 3 झालो. या जगात तुझे स्वागत आहे.”

मोहित रैनाने 2021 मध्ये आदिती शर्माशी लग्न केले होते. लग्नाची बातमी देखील अभिनेत्याने सोशल मीडिया पोस्टद्वारेच दिली होती. लग्नाचा फोटो काढताना मोहितने लिहिले की, ‘प्रेमात कोणतेही अडथळे जाणवत नाही, ते अडथळे पार करते, कुंपणावरुन उडी मारते, ते आशेने भरलेले असते. त्या आशेने आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने आपण आता दोन नाही तर एक आहोत. या नवीन प्रवासात तुमच्या सर्वांच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे. अदिती आणि मोहित.”

आता लग्नाच्या एक वर्षानंतर त्यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आई-वडील झाल्याची गोड बातमीही शेअर केली आहे. मोहितच्या या पोस्टमुळे चाहत्यांसह मनोरंजन विश्वातील सेलिब्रेटीही सोशल मीडियावर या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत.

‘देवों के देव महादेव’ या शोमधून मोहित रैनाला घरोघरी ओळख मिळाली. याशिवाय ‘उरी’ आणि ‘शिद्दत’ यांसारख्या चित्रपटांमध्येही त्याचा अभिनय लोकांना आवडला आहे. अभिनेत्याने ‘काफिर’ आणि ‘मुंबई डायरीज 26/11’ सारख्या वेब सिरीजमध्येही जबरदस्त अभिनय केला आहे. अलीकडेच त्याने मुंबई डायरी 26/11 सीझन 2 चे शूटिंग पूर्ण केले आहे.