‘देवों के देव महादेव’ फेम मोहित रैनाने केले गुप...

‘देवों के देव महादेव’ फेम मोहित रैनाने केले गुपचुप लग्न : लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना दिले सरप्राईज (‘Devon Ke Dev’ Mahadev Actor Mohit Raina Secretly Marries Aditi, Shares Pictures Of His Wedding)

टेलिव्हिजनवरील शिव अर्थात ‘देवों के देव महादेव’ मोहित रैनाला अखेर त्याची पार्वती सापडली. मोहित रैनाने गर्लफ्रेंड अदिती सोबत गुपचुप लग्न करून चाहत्यांना नवीन वर्षात सुखद धक्का दिला आहे.

मोहित रैनाने काल १ जानेवारी २०२२ रोजी आपली गर्लफ्रेंड अदितीसोबत लग्न केले असून  लग्नाचे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करत आपल्या चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे.

फोटोंसोबत मोहितने एक प्रेमळ पोस्टही लिहिली आहे, त्यात त्यानं म्हटलंय, “प्रेम अडथळ्यांवर विश्वास ठेवत नाही, कितीही अडथळे आले तरी त्यावर मात करून, आशावादी राहून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचते. त्याच आशेने आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने आता आम्ही दोन नाही तर एक झालो आहोत. या नव्या प्रवासात आम्हाला तुमच्या सर्वांच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे, अदिती आणि मोहित.”

लग्नासाठी मोहित रैनाने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली आहे, तर अदितीने पेस्टल रंगाचा लेहेंगा घातला आहे. दोघंही खूप सुंदर दिसत आहे. मोहित आणि अदिती यांची जोडी एकमेकांस अनुरूप दिसत आहे.

लग्नाचे फोटो शेअर करताच चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दिया मिर्झा, करण जोहरसह इंडस्ट्रीतील लोकही या जोडप्याला शुभेच्छा देत आहेत, तर चाहते आनस्क्रीन महादेव आणि त्याच्या पत्नीची तुलना शिव-पार्वतीशी करत आहेत.

मोहित रैना याने ‘देवों के देव महादेव’मध्ये भगवान शिवाची भूमिका साकारून घराघरात लोकप्रियता मिळवली. याशिवाय त्याने ‘बंदिनी’, ‘चेहरा’ आणि ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’मध्येही काम केले आहे. उरी: द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटात मोहितने विकी कौशलसोबत काम केले आहे. त्याचा शेवटचा चित्रपट ‘शिद्दत’ होता ज्यात तो डायना पेंटीसोबत दिसला होता.

याआधी मोहित रेना, मौनी रॉयसोबत रिलेशनशिपमध्ये होता. परंतु दोघांनीही आपल्या रिलेशनशिपबाबत कोणालाही थांगपत्ता लागू दिला नाही.