लिव्ह इनमध्ये राहूनही या कलाकारांचे नाते लग्नाप...
लिव्ह इनमध्ये राहूनही या कलाकारांचे नाते लग्नापर्यंत पोहचू शकले नाही(Despite living in a live-in, the relationship of these actors could not reach marriage)

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे एकत्र काम करता करता एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा संपूर्ण इंडस्ट्रीत गाजतात. पुढे त्यांच्या नात्याचे रुपांतर लग्नात होते तर काहींचे नाते मात्र अर्धवट तुटते.आज आम्ही तुम्हाला अशाच काहीशा नात्यांबद्दल सांगणार आहोत. ज्यांचे रिलेशनशिप खूप गाजले पण नंतर पुढे काहीच घडले नाही. आणि सर्व अर्धवटच तुटले.
जॉन अब्राहम आणि बिपाशा बसु
या यादीत जॉन आणि बिपाशाचे नाव पहिले येते. एकेकाळी यांची जोडी बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध होती. त्यांच्या चाहत्यांनासुद्धा त्यांची जोडी खूप आवडायची. दोघे बराचकाळ लिव्ह इनमध्ये राहिले होते. पण काहीतरी बिनसले आणि त्यांचे ब्रेकअप झाले पुढे ब्रेकअप झाल्यावरजॉनने प्रियाशी लग्न केले, तर बिपाशा बसूने करण सिंग ग्रोव्हरशी लग्न केले.
सैफ अली खान-रोजा कॅटलानो
सैफ अली खानने अमृता सिंगसोबत लग्न केले होते हे सर्वांनाच माहित आहे. यादोघांना सारा आणि इब्राहिम ही मुले देखील आहेत. पण त्यांच्यात विस्तव जात नसल्यामुळे त्यांनी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. पुढे त्याचे करीनासोबत लग्न झाल्याचेही सर्वांना माहित आहे. पण तिच्याशी लग्न होण्यापूर्वीही अभिनेता आणखी एकीच्या प्रेमात पडला होता.तिचे नाव रोजा कॅटालानो होते. ता एक परदेशी मॉडेलही होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते, परंतु हे नाते पुढे जाऊ शकले नाही. नंतर सैफ करीनाच्या प्रेमात पडला आणि बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले.
विक्रम भट्ट-अमीषा पटेल
या यादीत विक्रम भट्ट यांचेही नाव आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये विक्रम आणि अमिषाच्या अफेअरच्या चर्चा चालल्या होत्या. मात्र, दोघांचे प्रेम लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. अमिषा पटेल अजूनही सिंगल असून लवकरच ती दीर्घ काळानंतर गदर चित्रपटाच्या सिक्वेलमधून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.
सुशांत सिंह राजपूत-अंकिता लोखंडे
पवित्र रिश्ता फेम सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडायची. दोघांनी या मालिकेत पती-पत्नीची भूमिका केली होती. मालिकेदरम्यान दोघांमधील जवळीक वाढली. पण अचानक सुशांतने चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि तिथेच त्यांच्यात काहीतरी बिनसले. व त्यांचे ब्रेकअप झाले. पुढे सुशांतचे नाव रिया चक्रवर्तीसोबत जोडले गेले होते. सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिताने तिचा प्रियकर विकी जैनसोबत लग्न केले.