करोडोंची मालक असूनही अगदी साधे आयुष्य जगते अभिन...

करोडोंची मालक असूनही अगदी साधे आयुष्य जगते अभिनेत्री रुपाली गांगुली (Despite Being Mistress of Crores, Rupali Ganguly is Very Simple, Likes to Live a Simple Life)

हिंदी मालिकांमध्ये हिट शो ‘अनुपमा’ टीआरपीच्या रेसमध्ये नेहमीच अव्वल असतो. लोकांना ही मालिका खूप आवडते. अनुपमाची भूमिका करणारी रुपाली गांगुली प्रत्येक घरात खूप लोकप्रिय आहे. रुपाली गांगुली ही छोट्या पडद्यावरील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती एका एपिसोडसाठी मोठी रक्कम घेते. पण रूपाली गांगुली करोडोंच्या मालमत्तेची मालक असून तिला अतिशय साधे राहणे आणि साधे जीवन जगणे आवडते. तिच्या याच गुणांमुळे कोणीही तिच्याकडे सहज आकर्षित होते.

‘अनुपमा’ या व्यक्तिरेखेसाठी घराघरात लोकप्रिय असलेली रुपाली गांगुली ही टीव्हीची सर्वात महागडी अभिनेत्री आहे. भरमसाठ फी घेणार्‍या रुपालीकडे कोट्यवधींची संपत्ती आहे, पण ती लक्झरी लाइफ जगण्याऐवजी सामान्य जीवन जगणे पसंत करते. तिने 2000 साली ‘सुकन्या’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर करीअरला सुरुवात केली होती, त्यानंतर ती ‘संजीवनी’मध्ये दिसली.

मात्र, रुपाली गांगुलीला खरी ओळख ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या कॉमेडी मालिकेतील मोनिषा साराभाईच्या भूमिकेतून मिळाली. मालिकांमधील दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी रुपाली काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसली आहे. मध्यंतरीचा काही काळ तिने इंडस्ट्रीतून ब्रेकही घेतला होता.

रुपाली गांगुलीसाठी ‘अनुपमा’ ही मालिका तिच्या करीअरमधील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरली आहे. या शोमधून अभिनेत्रीने पुन्हा एकदा टीव्हीवर पुनरागमन केले आणि तिचे पुनरागमन धमाकेदार ठरले. या शोमधील अनुपमाच्या पात्राने तिला टीव्हीच्या सर्वाधिक हिट आणि टॉप अभिनेत्रींच्या यादीत स्थान मिळवून दिले.

अनुपमाच्या यशासोबतच रुपाली गांगुलीच्या फीमध्येही प्रचंड वाढ झाली आणि आता ती इंडस्ट्रीतील सर्वात महागडी अभिनेत्री मानली जाते. रिपोर्ट्सनुसार, रुपाली गांगुली एका एपिसोडसाठी 3 लाख रुपये फी घेते. या शोमधील इतर पात्रांच्या तुलनेत तिची फी सर्वाधिक आहे.

रुपालीच्या मालमत्तेबद्दल बोलायचे झाले तर तिची एकूण संपत्ती 20 कोटी रुपये आहे. अभिनेत्री आपल्या कुटुंबासोबत मुंबईत एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहते. तिच्याकडे महागडी वाहने देखील आहेत, तरीही ती कधी रिक्षा किंवा कधी ट्रेनमध्ये प्रवास करताना दिसते. अभिनेत्रीला प्राणी आणि वृद्धांसाठी निवारा बांधण्याची इच्छा आहे त्यामुळे ती पैसे वाचवत आहे.