रूप आणि गुण यात कमी नाही, तरी या अभिनेत्रींना क...

रूप आणि गुण यात कमी नाही, तरी या अभिनेत्रींना काम नाही…. एकीने तर सिनेमासाठी सिरीयल सोडली (Despite Being Beautiful And Talented, These Actresses Are Not Getting Films, One Left The Serial For Film)

बॉलिवूडमध्ये अशी काही उदाहरणे बघायला मिळतात, की इथे फक्त रूप आणि गुण असून चालत नाही. कारण अशा अभिनेत्रींना काम मिळेनासे आले आहे. टी.व्ही. उद्योगातही अशी उदाहरणे बघायला मिळतात. बॉलिवूडच्या अशा काही अभिनेत्रींचा आढावा घेऊया, ज्या दिसायला रूपवान आहेत. त्यांचा बांधा कमनीय आहे, चित्रपटही यशस्वी झाले आहेत. तरी पण कामाची वानवा आहे.

नेहा शर्मा : ‘क्रूक’ या गाजलेल्या चित्रपटातून नेहा शर्मा रुपेरी पडद्यावर आली. यामध्ये ती इमरान हाशमीची नायिका होती. यानंतर बघा, नेहाने ‘जयंतीभाई की लव्ह स्टोरी ‘, ‘क्या सुपर कुल है हम’, ‘यंगिस्तान’, ‘तुम बिन २’; अशा अनेक चित्रपटात काम केले. पण आज ती बेकार आहे.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम
इलियाना डिक्रुज  : अक्षयकुमार आणि अजय देवगण यांच्या सह कित्येक स्टार्स बरोबर काम केलेली इलियाना, दिसायला सुंदर आहे नि अभिनयात गुणी आहे. तिनं दाक्षिणात्य चित्रसृष्टीत पण पाऊल टाकले होते. पण आज तिच्याकडे काम नाही.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम
यामी गौतम ; सुंदर दिसण्याच्या बाबतीत कतरिना कैफ आणि प्रियंका चोप्रा यांच्याशी स्पर्धा करणारी यामी गौतम; ‘काबिल’, ‘विकी डोनर’, ‘बाला’, ‘उरी’, अशा अनेक चित्रपटांतून गाजली. तरी पण आज ती टॉपची अभिनेत्री होऊ शकली नाही. चित्रसृष्टीत येण्यापूर्वी यमीने बऱ्याच टीव्ही मालिकात काम केले होते.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम
एव्हलीन शर्मा : एव्हलीनने ‘यारीयां’, ‘मै  तेरा हिरो’, ‘ये जवानी है दिवानी’, यांसारख्या अनेक चित्रपटातून नायिकेच्या भूमिका केल्या. पण तिचे नाव काही फार गाजले नाही. आता नाईलाजाने ती चित्रपटांमध्ये लहानसहान भूमिका करते आहे.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम
प्राची देसाई : टेलिव्हिजन मालिकांमधून चित्रसृष्टीत पाऊल टाकलेली प्राची देसाई दिसायला सुंदर आणि अभिनयात गुणी आहे. तिने ‘पुलीसगिरी’, ‘अजहर’, ‘बोल बच्चन’, ‘वन्स अपॉन या टाइम इन मुंबई’, अशा अनेक चित्रपटांतून कामे केली. लोकांना ती आवडली देखील. तरी पण आज तिच्याकडे नवीन चित्रपट नाहीत.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम