देशी ड्रिंक : ट्रॉपिकल फ्रूट क्रश (Desi Drink :...
देशी ड्रिंक : ट्रॉपिकल फ्रूट क्रश (Desi Drink : Tropical Fruit Crush)

By Shilpi Sharma in खाद्यजीवन

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी चहा-कॉफी ऐवजी काही खास करायचं असेल तर देशी ड्रिंक म्हणजे ट्रॉपिकल फ्रूट क्रश नक्की बनवा. लिची, अननस आणि पपयाच्या स्वादाचं हे पेय झटपट बनतं आणि तितक्याच लवकर थकवाही घालवतं. अतिशय हेल्दी आणि पिण्यास आवडेल असं हे पेय आहे.
साहित्य :
२ कप लिची (सोललेली)
अर्ध अननस (स्लाइस करून घ्या)
१ लहान पपई (सोलून, त्याचे बारीक तुकडे करून घ्या.)
२ लिंबांचा रस
१ कप थंड पाणी
२/३ कप बर्फाचा चुरा
कृती :
बर्फाचा चुरा सोडून बाकी सर्व साहित्य एकत्र करून फूड प्रोसेसरमध्ये घाला. त्याची स्मुदी बनवून ग्लास मध्ये काढा. नंतर त्यात बर्फाचा चूरा घालून थंड थंड सर्व्ह करा.