30 वर्षे इंडस्ट्रीत काम करुनही डेलनाझ इराणीला ग...

30 वर्षे इंडस्ट्रीत काम करुनही डेलनाझ इराणीला गेली 11 वर्षे इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याने करावी लागतेय कामाची मागणी (Delnaaz Irani pleads for work, Actress is out of work, Says- She is unhappy with ‘groupisms’ and ‘camps’ in bollywood)

2003 मध्ये आलेल्या ‘कल हो ना हो’ या चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारुन लोकप्रिय झालेली अभिनेत्री डेलनाझ इराणी गेली बरेच दिवस पडद्यावरुन गायब आहे. यामागील कारण सांगताना अभिनेत्रीने 11 वर्षांपासून काम मिळत नसल्याची व्यथा मांडली. इंडस्ट्रीत आता खूप ग्रुपिझ्म आणि कॅम्प चालतात, असेही ती म्हणाली. एवढेच नाही तर डेलनाझने इंडस्ट्रीतील लोकांकडे कामासाठी विनवणीही केली आहे.

शाहरुख खानसोबत ‘कल हो ना हो’मध्ये काम करणारी डेलनाझ अनेक टीव्ही शो आणि रिअॅलिटी शोमध्येही दिसली आहे, पण 2011 मध्ये आलेल्या ‘रा.वन’ चित्रपटानंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. डेलनाझला काम करायचे नाही असे नाही, पण तिला कोणी काम देतच नाही.

अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान डेलनाझने याबद्दल सांगितले की, मी नीना गुप्ता नाही, पण कोणी पाहिलं तर कदाचित ते मला काम देतील. कल हो ना हो नंतर मी कोणत्याही एजन्सी किंवा मॅनेजरसोबत हातमिळवणी केली नाही हे माझे चुकलेच. अभिनेत्री पुढे म्हणाली, “पूर्वी दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी थेट संबंध असायचा. सतीश कौशिकने ‘कल हो ना हो’ पाहून मला फोन केला होता. पण आता त्याच्याशीही संपर्क तुटला आहे. कास्टिंग डायरेक्टर्सच्या येण्यामुऴे गोष्टी अवघड झाल्या आहेत. संघर्ष वाढला आहे. ग्रुपिझ्म आणि कॅम्प वाढले आहेत.

डेलनाझने सोशल मीडियावर इन्फुएन्सरमुळे काम मिळत नसल्याचे सांगितले. जुन्या कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंटला ब्लू टीक नसल्यामुळे त्यांना काम मिळेनासे झाले आहे. हे सर्व पाहून मन दुखावले जाते असे ती म्हणाली.

डेलनाझ पुढे म्हणाली की, आता लोकांना सहाय्यक कलाकारांवर जास्त पैसे खर्च करायचे नाहीत. सोशल मीडिया इन्फुएन्सर वाढत आहेत. कास्टिंग डायरेक्टर्समुळे जुन्या कलाकारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आपण जर बराच काळ चित्रपटात दिसलो नाही तर लोकांच्या संपूर्ण विस्मरणात जाऊ शकतो.