दीपिका ते आलिया : सिनेमासाठी किती पैसे घेतात? ...

दीपिका ते आलिया : सिनेमासाठी किती पैसे घेतात? (Deepika To Aaliya : These Are Highest Paid Actresses)

हिंदी चित्रसृष्टीत नायक आणि नायिका यांना एका सिनेमासाठी मिळणाऱ्या मानधनाबाबत कायमच असमतोल राहिला आहे. चित्रपटाच्या यशात नायकाबरोबरच नायिकेचा महत्वाचा वाटा असला तरी त्यांच्यापेक्षा नायिकांना पैसे कमीच मिळत आले आहेत. पण आता हे चित्र बदलत चाललं आहे. कारण काही आघाडीच्या अभिनेत्री आपला दाम वाढवून मागत आहेत.

दीपिका पदुकोण
‘गहराईयां’ या नव्या चित्रपटाने दीपिका सध्या चर्चेत आहे. तिनं ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटासाठी ८ कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा आहे. तर आता ती एका चित्रपटासाठी दाम दुप्पटीने पैसे घेते. १५ कोटी रुपये. शिवाय काही चित्रपटांच्या मिळणाऱ्या गल्ल्यात हिस्सा मागते आहे.

आलिया भट्ट
‘गंगुबाई काठियावाडी’ या येऊ घातलेल्या चित्रपटाने आलिया प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. लहान वयात तिने मिळवलेले यश स्तिमित करणारे आहे. त्यामुळे ती एका चित्रपटासाठी १५ कोटी रुपये असा मेहनताना मागते आहे.

कंगना रणावत
आपल्या अभिनय कौशल्यावर  आघाडीची अभिनेत्री म्हणून कंगनाने यश मिळवलं आहे. ती एका चित्रपटासाठी १२ ते १५ कोटी रुपये मानधन घेते. पण ‘सीता’ बनण्यासाठी मात्र तिने ३२ कोटी रुपये घेतल्याचा बोलबाला आहे. जो आजवरच्या अभिनेत्रींमध्ये सर्वात मोठा आकडा आहे.

कतरीना कैफ
आताशा जिच्या लग्नाची चर्चा चालू आहे, ती कतरीना आधी कमी पैसे घेत होती. पण तिनं फिल्म इंडस्ट्रीत आपलं स्थान इतकं बळकट केलं की, आता ती एका चित्रपटाचे १२ कोटी रुपये मानधन घेते.

करीना कपूर
करीना विवाहित आहे. दोन मुलांची आई झालेली आहे. पण तिला बॉलिवूडमध्ये अद्याप मागणी आहे. ती एका चित्रपटासाठी १२ कोटी रुपये वसुल करते.

प्रियांका चोप्रा
प्रियांका सध्या अमेरिकेत स्थिरावली आहे. बॉलिवूडच्या चित्रपटात ती कमी प्रमाणात दिसत असली तरी, मिडिया रिपोर्टनुसार एका चित्रपटासाठी ८ कोटी रुपये, असे मानधन घेते.

कृती सेनन
कृतीने अभिनयात चांगली चमक दाखविली असल्याने, तिच्याकडे चित्रपटांची रंग लागलेली आहे. ‘लुकाछुपी’ या चित्रपटामुळे तिच्या लोकप्रियतेत भर पडली. त्यामुळे मीडिया रिपोर्टनुसार, कृती एका चित्रपटासाठी ४ कोटी रुपयांपर्यंत पैसे घेते.

कियारा आडवाणी
तरुण आणि सुंदर दिसणारी कियारा ‘शेरशाह’ चित्रपटाने चाहत्यांच्या मनात बसली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ती एका चित्रपटासाठी २. ५ कोटी रुपये गेले.

सारा अली खान
सारा अलीचे आतापावेतो फक्त ५ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. पण तिची सोशल मिडियावर लोकप्रियता अधिक आहे. पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार सारा एका चित्रपटाचे २ कोटी रुपये घेते.