बेशरम रंग गाण्यात दीपिका पादुकोणने घातलेल्या बि...

बेशरम रंग गाण्यात दीपिका पादुकोणने घातलेल्या बिकिनीसाठी मोजण्यात आलीय इतकी किंमत (Deepika-Padukone-Wore-Such-An-Expensive-Bikini-In-Besharam-Rang-Song)

शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाणं प्रदर्शित झाल्यापासून दीपिका पादुकोण आणि तिची त्या गाण्यातील बिकिनी फारच चर्चेत आली आहे. या एवढ्याशा बिकिनीमुळे चित्रपटाला विरोध होत आहे.

बेशरम रंग या गाण्यामधील भगव्या रंगाच्या बिकीनीमुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या असल्याचं म्हटलं गेलं. दीपिका या बिकिनीमध्ये शाहरुख खानसोबत सिझलिंग मूव्ह्ज करताना दिसली.

भगव्या बिकीनीसोबत दीपिकाची निऑन कलरची बिकिनी देखील चांगलीच चर्चेत आली. पण या एवढ्याशा बिकिनीची किंमत ऐकून तुम्ही गारच पडाल. अर्थात दीपिकाच्या हॉटनेसपुढे ती किंमतही कमीच पडावी. असो.

तर दीपिकाच्या ‘लुईसा बल्लाऊ’ ब्रँडच्या या बिकिनीची किंमत 19,773 आहे. म्हणजे जवळपास २० हजाराच्या घरात आहे. एवढेच नाही तर बेशरम रंग गाण्यात दीपिकानं घातलेल्या सोनेरी रंगाच्या मेटॅलिक स्विमसूटची किंमत बारा हजार रुपये आहे.

एवढी किंमत मोजल्यामुळेच गाण्यातील तिचा प्रत्येक लुक कमालीचा हॉट दिसत आहे. शिवाय त्यातील प्रत्येक लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे सगळं पाहता केवळ एका गाण्यामुळे हिरो-हिरोइनपेक्षा बिकिनीच जास्त प्रसिद्धी पावली आहे, असे म्हणावयास हरकत नाही.