एअरपोर्ट लूकसाठी दीपिका पादुकोणने घातले ओव्हरसा...
एअरपोर्ट लूकसाठी दीपिका पादुकोणने घातले ओव्हरसाइज कपडे, ट्रोलर्सनी विचारले- नवऱ्याचे कपडे घालून फिरतेस का ? (Deepika Padukone Wears Husband Ranveer Singh Clothes Brutally Trolled For Latest Oversized Airport Look)

अभिनेत्री दीपिका पादुकोण तिच्या पठाण चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती, मात्र यावेळी ती तिच्या चित्रपटामुळे नाही तर तिच्या एअरपोर्ट लूकमुळे चर्चेत आहे. अलीकडेच दीपिका मुंबई विमानतळावर दिसली होती. दीपिका विमानतळाबाहेर येताच तिला ओव्हरसाईज आउटफिटमध्ये पाहून ट्रोलर्सनी तिला एअरपोर्ट लूकसाठी ट्रोल करण्यास सुरुवात केली.
अभिनेत्री दीपिका पदुकोण आपल्या आगामी ‘फायटर’ चित्रपटाचे शूटिंग शेड्यूल पूर्ण करून मुंबईत परतली. त्यावेळी तिने मोठ्या आकाराचा पोशाख परिधान केला होता. दीपिकाच्या चाहत्यांना तिचा विमानतळावरील लूक आवडला नाही. दीपिकाच्या या ओव्हरसाईज लूकसाठी ट्रोलर्स तिला चांगलेच ट्रोल करत आहेत.

दीपिका पदुकोणच्या लेटेस्ट एअरपोर्ट लूकचा व्हिडिओ पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहे. दीपिकाने हिरव्या रंगाचा सैल ट्रॅकसूट आणि ओव्हरसाईज कोट घातला आहे. तिचा ओव्हरसाईज लूक पाहून सोशल मीडियावर ट्रोलर्स तिला चांगलेच ट्रोल करत आहेत.

अभिनेत्रीचा हा ओव्हरसाईज लूक पाहून ट्रोलर्सना दीपिकाचा नवरा रणवीर सिंहची आठवण झाली. अभिनेत्रीचा हा लूक पाहून एका ट्रोलरने लिहिले की, दीपिकाने तिच्या फॅशनच्या सर्व कल्पना गमावल्या आहेत. त्यामुळे तिने पती रणवीर सिंगचे ऑफ कलर कपडे घालायला सुरुवात केली आहे. तर एकाने दीपिकाच्या या स्टाइलला नाईट ड्रेस म्हटले आहे.
दीपिका तिच्या आगामी ‘फाइटर’ चित्रपटाच्या शूटिंगनंतर मुंबईत परतत होती. त्यानंतर ती या लूकमध्ये एअरपोर्टवर स्पॉट झाली. या चित्रपटात दीपिकासोबत हृतिक रोशनही दिसणार आहे.