दीपिका पदुकोणला वयाच्या १८ व्या वर्षीच स्तनांचे...

दीपिका पदुकोणला वयाच्या १८ व्या वर्षीच स्तनांचे ऑपेरेशन करून घेण्याचा सल्ला देणारा महाभाग भेटला होता. (Deepika Padukone Was Advised To Go For Breast Implant Surgery, When She Was 18)

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री म्हणून दीपिका पदुकोणचा बोलबाला आहे. आपले रूप व गुणांनी आज ती यशोशिखरावर आहे. पण हे यश मिळविताना काही लोकांनी चुकीचे सल्ले दिले होते, याची तिला खंत आहे. त्याचबरोबर एक अतिशय चांगला सल्ला एका सुपरस्टारने दिला होता, त्याबद्दल ती त्याची ऋणी आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
एका मुलाखती दरम्यान आपल्याला मिळालेल्या सर्वाधिक वाईट सल्याचा उल्लेख केला. तिनं  सांगितले की, मी फक्त १८ वर्षांची असताना मला स्तनांचे ऑपरेशन करून घे, असं सांगणारा महाभाग भेटला होता. “त्याचा हा सल्ला मी गंभीरपणे घेतला नाही. अन ब्रेस्ट इम्प्लान्ट करण्याच्या भानगडीत पडले नाही.”

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
मग दीपिकाला मिळालेला सगळ्यात चांगला सल्ला कोणता? या प्रश्नावर तिनं सांगितले, “शाहरुख खान हा नेहमीच चांगले सल्ले देतो. मी त्याच्याकडून बरंच काही शिकले आहे. सुरवातीलाच त्याने मला चांगला सल्ला दिला होता की, ज्या लोकांना तू चांगली ओळखतेस त्यांच्या सोबतच काम कर. त्यांच्या सोबततुझा वेळ चांगला जाईल. कारण आपण चित्रपट बनवतो म्हणजे जीवन जगत असतो. आठवणी गुंफत असतो आणि अनुभव मिळवत असतो.”

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
दीपिका पदुकोणने २००७ साली याच शाहरुख खानची नायिका म्हणून ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून पदार्पण केलं होत. त्यानंतर एका पाठोपाठ एक चांगले चित्रपट करून आज ती आघाडीची तारका बनली आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
आता ‘गहराइयां’ या चित्रपटामुळे तिची सर्वत्र चर्चा होत आहे. शाहरुखची नायिका म्हणून तिचा ‘पठाण’ हा आगामी चित्रपट आहे. तर ‘फाइटर’ या चित्रपटातून ती प्रथमच हृतिक रोशन बरोबर दिसणार आहे.