दीपिका पादुकोणला पदार्पणाच्या चित्रपटातूनच काढण...

दीपिका पादुकोणला पदार्पणाच्या चित्रपटातूनच काढणार होते बाहेर, जाणून घ्या काय आहे किस्सा (Deepika Padukone was about to left out of from debut film, know this interesting story of ‘Om Shanti Om’)

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचे नाव इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी आणि प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. मॉडेलिंगच्या दुनियेत नाव आणि प्रसिद्धी मिळवल्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणाऱ्या दीपिका पादुकोणने एकाहून एक जबरदस्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. चाहत्यांना तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या दमदार अभिनयाचीही भूरळ पडली आहे. दीपिकाने ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, परंतु तिला तिच्या पहिल्याच चित्रपटातून बाहेर काढण्यात येणार होते.

आपल्या डिंपल्स आणि मनमोहक हास्याने सगळ्यांना भुरळ पाडणाऱ्या 37 वर्षीय दीपिका पादुकोणने ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करीअरची सुरुवात केली.  दीपिकाने जेव्हा या चित्रपटात काम करायला सुरुवात केली तेव्हा ती अभिनयाच्या बाबतीत खूपच कमकुवत होती.

एका मीडिया रिपोर्टमध्ये असे सांगितले होते की, अभिनयाचा अनुभव नसल्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दीपिकाला शॉट्स देण्यात खूप अडचणी येत होत्या. याशिवाय असे म्हटले जाते की दीपिका परफेक्शनवर जास्त लक्ष द्यायची, यामुळे चित्रपटाची दिग्दर्शक फराह खान तिच्यावर रागावायची.

दीपिकाच्या या वागण्याने व्यथित होऊन फराह खान तिला सेटवरच अनेकदा ओरडायची, तरीही अभिनेत्रीच्या सवयी सुधारत नव्हत्या. एकेकाळी फराह खान दीपिकावर इतकी नाराज होती की तिच्या मनात दीपिकाला चित्रपटातून हाकलून देण्याचे विचारही आले होते, पण नंतर तिने दीपिकासोबत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आणि चित्रपट प्रदर्शित झाला. ओम शांती ओम या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती.

‘ओम शांती ओम’ चित्रपटापूर्वी दीपिका पादुकोणने हिमेश रेशमियाच्या ‘नाम है तेरा’ या हिट अल्बममध्ये काम केले होते, तेव्हाच फराह खानने तिची दखल घेतली आणि दीपिकाला आपल्या चित्रपटासाठी ऑफर दिली, तेव्हा फराह एका नवीन चेहऱ्याच्या शोधात होती.

 चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी दीपिका मॉडेलिंग करायची आणि अभिनय शिकण्यासाठी तिने अनुपम खेर यांच्या अभिनय शाळेत तीन महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी दीपिका कन्नड चित्रपट ‘ऐश्वर्या’मध्ये दिसली होती.