वडिलांचा वाढदिवस खास बनवण्यासाठी दीपिका पोहोचली...

वडिलांचा वाढदिवस खास बनवण्यासाठी दीपिका पोहोचली तिरुपतिला, तिचे सिंपल लूकमधले फोटो होत आहेत व्हायरल…(Deepika Padukone Visits Tirupati Temple With Family On Father Prakash Padukone’s Birthday, See Viral Pictures)

यावर्षी ७५ वा कान्स फिल्म फेस्टिवल मोठ्या दिमाखात साजरा झाला. बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण या सोहळ्याची ज्यूरी मेंबर होती. काही दिवसांपूर्वी कान्स फेस्टीवलला आपल्या स्टाइल आणि हॉट अंदाजाने सगळ्यांना घायाळ करणारी दीपिका सध्या तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. वडिलांच्या ६७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून दीपिकासह तिच्या कुटुंबातील सर्व तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले आहेत.

यावेळी दीपिका सिंपल ट्रॅडीशन लूकमध्ये दिसली. दीपिकाने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. ज्यावर गडद मरुन रंगाची सोनेरी काठ असलेली शॉल घेतली होती. केस लो टाइट बनने बांधले होते. अनवाणी, हात जोडून संपूर्ण श्रद्धेने मंदीराच्या आवारात चालत असल्याचे दीपिकाचे फोटो व्हायरल होत आहे. तिच्या पाठी तिचे वडील प्रकाश पादुकोण पांढऱा कुर्ता आणि मरुन शॉलमध्ये दिसत आहे.

मंदिरातले सर्व नियम पाळून व तोंडाला मास्क लावून पादुकोण कुंटुंबाने दर्शन घेतले. दीपिकाचा तिच्या वडिलांसोबतचा फोटो खूप व्हायरल होत असून तिच्या चाहत्यांना तो खूप आवडला आहे. मंदिरातला दीपिकाचा सिंपल लूकसुद्धा नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे. दीपिकाचे वडिलांसाठीचे प्रेम आणि देवासाठीची श्रद्धा पाहून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

दीपिकाचे वडील प्रकाश पादूकोण प्रसिद्ध नॅशनल बॅडमिंटन प्लेअर होते. दीपिकाही पूर्वी बॅडमिंटन खेळायची पण करियरच्याबाबतीत तिने तिचा मोर्चा मॉडेलिंगकडे वळवला. आणि आज ती इंडस्ट्रीमधली यशस्वी अभिनेत्री आहे. दीपिका लवकरच शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसोबत पठाण चित्रपटात दिसणार आहे.