दीपिका पादुकोणची बहीण अनिशा पादुकोण आहे ‘...

दीपिका पादुकोणची बहीण अनिशा पादुकोण आहे ‘देशाचा गौरव’ (Deepika Padukone Sister Anisha Padukone Is A Profesional Golf Player, Who Is Not Less Than Any Bollywood Celebrity)

दीपिका पादुकोण ही बॉलीवूडमधील अशी अभिनेत्री आहे की जी काही न करताही सदैव चर्चेत असते. सोशल मीडियावर तिची एक झलक दाखवणारे व्हिडीओ मोठ्या संख्येने पाहिले जातात. सोशल मीडियावरील तिच्या पोस्ट, फोटो आणि सिनेमांव्यतिरिक्त तिचं वैयक्तिक आयुष्य हे सारं नेहमीच चर्चेत असलेलं पाहायला मिळतं. अलीकडेच एका हॉटेलच्या बाहेर दीपिका तिची लहान बहीण अनिशा पादुकोणसोबत डिनरला गेली असताना पाहण्यात आली. अनिशाचा ग्लॅमर इंडस्ट्रीशी दूर दूरपर्यंत संबंध नसला तरी ती कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही.

दीपिका पादुकोण आणि अनिशा पादुकोण यांच्यात ५ वर्षाचं अंतर आहे. अनिशाने आपले वडील प्रकाश पादुकोण यांच्याप्रमाणेच स्पोर्ट्स मध्ये करिअर बनवलं आहे. दीपिका आणि अनिशाचे वडील प्रकाश पादुकोण हे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू होते. दीपिकासाठी त्यांचे वडील हिरोसमान आहेत, तर दुसरीकडे अनिशासाठी तिचे वडील खेळातील आदर्श आहेत. अनिशानं आपल्या बहिणीसारखं अभिनय क्षेत्र न निवडता गोल्फर बनण्याचं स्वप्न पाहिलं आणि आज ती यशस्वी गोल्फर आहे.

अनिशा स्वतःला लाइमलाइटपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसते. ती नेहमीच खूप निवडक फोटो सोशल मीडियावर शेअर करते. दीपिका ग्लॅमर इंडस्ट्रीत टॉपवर असूनही अनिशा मात्र अगदी साधं, सोज्वळ आयुष्य जगताना दिसते.