दीपिका पादुकोणने शेअर केला बालपणीचा फोटो; म्हणा...

दीपिका पादुकोणने शेअर केला बालपणीचा फोटो; म्हणाली, ‘मी आहे गुंडी…’ (Deepika Padukone shares her childhood picture; says to herself – Gundi!)

चित्रपटांप्रमाणेच सोशल मीडियावर देखील दीपिका पादुकोण चांगलीच सक्रीय असते. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नित्यनेमाने नवनव्या आणि रंजक पोस्ट ती टाकत असते. आता तिने आपला असा एक फोटो टाकला आहे; जो बघून तिचे चाहते खूश झाले आहेत. दीपिकाने बालपणीचा फोटो टाकला आहे आणि लिहिलंय की – ‘इंदिरानगरकी गुंडी हूं मैं.’ सोबत हसरा इमोजी ठेवून तिनं म्हटलं आहे की, हा फोटो आपल्या मामाने घेतला आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

बालपणीचा फोटो शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. ती अधूनमधून आपले बालपणीची फोटो प्रसिद्ध करत असते. दीपिकाने आपली वेबसाईट निर्माण केल्याने चर्चेत आली. तिचा नवरा रणवीर सिंहने ही वेबसाईट लॉन्च केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. दीपिकाचा नवरा असल्याचा आपल्याला अभिमान आहे, अशी नोट त्याने या प्रसंगी लिहिली.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

दीपिका आणि रणवीर ‘८३’ या चित्रपटात एकत्र दिसतील. शिवाय दीपिका, अमिताभ बच्चन समवेत ‘द इंटर्न’ या चित्रपटात  दिसणार आहे. अन्‌ ‘पठान’ या चित्रपटात ती शाहरुख खानची नायिका झाली आहे.