दीपिकाने शेअर केले तिच्या चाहत्यांनी काढलेले पो...

दीपिकाने शेअर केले तिच्या चाहत्यांनी काढलेले पोर्टेटस् (Deepika Padukone Shared Pictures Of Art Made By Fans)

अभिनेत्री दीपिका पादुकोण सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. सध्या ती तिच्या आगामी चित्रपट पठानच्या स्पेन शेड्यूलच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिने चाहत्यांनी काढलेले काही पोर्टेटस्‌ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

दीपिकाने सिनेमामधून बाजीराव मस्तानी, राणी पद्मावत, यांसारख्या ज्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत, त्या व्यक्तीरेखांची ही हुबेहुब पोर्टेटस्‌ आहेत.

दीपिकाने आपल्या या पोस्टला “टॅग केलेल्या पोस्ट पाहत असताना मला हे सोनं सापडलं”, अशा आशयाची कॅप्शन दिली आहे. तर या पोर्टेटकडे पाहिल्यानंतर दीपिकाचा पती रणवीर सिंगला देखील न राहवून त्याने ‘ब्युटीफुल’ अशी कमेंट करत दीपिकाच्या चाहत्यांचं कौतुक केलं आहे.

(सर्व फोटो : दीपिका पदुकोण/ इन्स्टाग्राम)