दीपिका हॉस्पिटलमध्ये भरती झाल्याची अफवा पसरल्या...

दीपिका हॉस्पिटलमध्ये भरती झाल्याची अफवा पसरल्यानंतर, पहिल्यांदाच विमानतळावर आईसोबत दिसली अभिनेत्री (Deepika Padukone Seen At Airport With Mom After Reports Of Hospitalisation, See Photos And Videos)

काही दिवसांपूर्वी दीपिकाला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये भरती केल्याचे म्हटले जात होते. पण अलिकडेच ती आपल्या आईसोबत विमानतळावर दिसल्यामुळे ती अफवा असल्याचे सिद्ध झाले. दीपिका व तिच्या आईचे विमानतळावरील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असून त्यात ती निरोगी आणि आनंदी दिसत आहे.

रुग्णालयात दाखल झाल्याच्या अफवेनंतर दीपिका पहिल्यांदाच मुंबई विमानतळावर दिसली. त्यावेळी तिच्यासोबत तिची आईदेखील होती.

विमानतळावर उपस्थित असलेल्या पापाराझींनी दीपिकाला तू रुग्णालयात अॅडमिट होतीस का ? असा प्रश्न विचारला मात्र त्यावेळी तिने उत्तर देणे टाळले. शिवाय हॉस्पिटलकडून सुद्धा कोणतेही स्पष्टीकरण आले नाही. पण विमानतळावरुन व्हायरल झालेल्या व्हिडिओत दीपिका खूप चांगल्या मूडमध्ये दिसत होती.

पापाराझीच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्यात दीपिका कारमधून उतरत आहे. दीपिकाने यावेळी ब्लॅक हाई-नेक टॉपवर स्लीपलेस स्ट्राइप्ड स्वेटर घातला होता. तसेच तिने केस बांधले होते व चेहऱ्यावर मास्क लावला होता. विमानतळाच्या गेटमधून आत जाताना दीपिकाने कॅमरामनकडे पाहून स्मित हास्य देत फोटोसाठी पोज दिली.

पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार दीपिकाला मुंबईतील ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. अभिनेत्रीला अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तिच्या सर्व मेडीकल टेस्ट केल्या गेल्या. त्यानंतर तिच्या तब्येतीत सुधार झाल्याचेही म्हटले जाऊ लागले. दीपिका आजारी असल्याच्या बातमीमुळे दीपिकाचे चाहते चिंतेत होते. पण आता दीपिकाचे विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सगळे खुश झाले आहेत.

दीपिकाला विमानतळावर पाहताच चाहत्यांनी गेट वेल सून असे मेसेज करायला सुरुवात केली. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एका यूजरने लिहिले की, ‘मला वाटते की ती हृदयाच्या उपचारासाठी अमेरिकेला जात असावी… कदाचित तिला हृदयविकाराचा आजार असेल. लवकर बरी हो.’