जन्माष्टमीच्या मुहूर्तावर दीपिकी रणवीरने केला न...

जन्माष्टमीच्या मुहूर्तावर दीपिकी रणवीरने केला नव्या घरात गृहप्रवेश (Deepika Padukone- Ranveer Singh Perform Griha Pravesh Puja At Their Plush New Home, See Inside Pics)

बॉलिवूडचे प्रसिद्ध कपल दीपिका आणि रणवीरचे एकत्र फोटो पाहणे ही त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच एक व्हिज्युअल ट्रीट असते. दोघांमधील घट्ट बॉण्डिंग त्यांच्या चाहत्यांना नेहमीच भावते. पण ते त्यांचे वैयक्तिक आयुष्य खूप खासगी ठेवतात.

काल, संपूर्ण देश मोठ्या थाटामाटात जन्माष्टमीचा सण साजरा करत होता, तेव्हा या शुभ दिवशी रणवीर-दीपिकाने गुपचुप त्यांच्या नवीन घरात गृहप्रवेश केला. त्या गृहप्रवेशाचे फोटो रणवीरने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.

अलीकडेच या दोघांनी मुंबईजवळ असलेल्या अलिबाग येथे करोडो रुपयांचा बंगला खरेदी केला होता. त्याच बंगल्याच्या पूजेचे फोटो रणवीरने शेअर केले. फोटोंमध्ये रणवीर आणि दीपिकाने विधीवत पूजा केल्याचे पहायला मिळते.

पहिल्या फोटोत रणवीर आणि दीपिका गृह प्रवेशाची पूजा करताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये होम-हवन केले जात आहे. पुढील फोटोत कलश दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत दोघेही आरती करत आहेत. तर एका फोटोत ते बंगल्याचा दरवाजा उघडत आहे.

पण कोणत्याही फोटोत दोघांचे चेहरे मात्र दिसत नाहीत. त्यांनी ही पूजा अगदी साध्या पद्धतीने केली असून पूजेला दोघांच्या कुटुंबीयांचाच सहभाग होता. फोटोमध्ये रणवीर आणि दीपिका पांढऱ्या पोशाखात दिसत आहेत.

रणवीर दीपिकाचे हे नवे घर अलिबाग किनाऱ्यावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे त्यांचे हॉलिडे होम आहे. रणवीर आणि दीपिकाचे नवीन घर 2.25 एकरमध्ये पसरले असून ते 5 बीएचके आहे. हा दुमजली बंगला आहे.

रणवीरने या फोटोंना कोणतेच कॅप्शन दिलेले नाही.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम