पॅरिस फॅशन वीकमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणचा ...
पॅरिस फॅशन वीकमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणचा जलवा (Deepika Padukone Poses In Classy Black Leather Dress For Paris Fashion Week)

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या सोशल मीडियावर भरपूर चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच यंदाच्या ऑस्कर २०२३ पुरस्कारांसाठी प्रेझेंटर म्हणून तिला नामांकन मिळालं. त्यामुळे सर्व स्तरावरून तिचे कौतुक होत आहे. अशातच अभिनेत्रीने आता पॅरिस फॅशन वीकमध्ये उपस्थिती लावली.
तेथील तिचा बोल्ड फॅशन लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभागी होण्यासाठी दीपिका पॅलेसला पोहोचली. अभिनेत्रीने नुकतेच तेथील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो दीपिका ऑल ब्लॅक लेदर लूकमध्ये दिसत आहे.हे फोटो शेअर करताना दीपिकाने “#LVFW23 @louisvuitton @nicolasghesquiere।” असे कॅप्शन दिले.
फोटो दीपिकाने लेदर ब्लेझर विदाऊट पॅन्ट कॅरी केले आहे. तसेच चेहऱ्यावर स्मोकी आय मेकअप, न्यूड लिपस्टिक आणि हलके कर्ली केस असा लूक केला आहे. अभिनेत्रीचा हा फॅशनेबल आणि स्टायलिश लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोवर चाहते लाईक आणि कमेंट्स वर्षाव करत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये म्हटले की फॅशनच्या दुनियेत भारतासाठी हा गर्वाचा क्षण आहे.