दीपिका पादुकोनची नववर्ष सहल (Deepika Padukone N...

दीपिका पादुकोनची नववर्ष सहल (Deepika Padukone New Year Trip to Ranthambore)

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दीपिका पादुकोन, आपला नवरा रणवीर सिंह आणि परिवारासह राजस्थानातील रणथंबोर अभयारण्यात गेली. कडाक्याच्या थंडीत तिनं निसर्गाच्या सान्निध्यात आपल्या या सहलीचा आनंद लुटला. त्याचे फोटो तिनं प्रदर्शित केले आहेत. यामध्ये वाघ, अन्य वन्यप्राणी, पक्षी, जंगल आणि सूर्योदय व पूर्णचंद्राचे फोटो व व्हिडिओज्‌ आहेत. तसेच काही छान छान गप्पा प्रसारित केल्या.

तिच्या परिवारातील सदस्य आणि नजिकचे मित्र तिला नेहमीच विचारतात की, अमाप लोकप्रियता व श्रीमंती लाभून देखील तिची वागणूक अजिबात बदलली नाही. तिला अजिबात गर्व नाही. असे का? यावर ती विनम्रपणे उत्तर देते की, माझ्या जीवनात घरची माणसे आणि मित्रपरिवाराला खास स्थान आहे. ते लोक मला नेहमीच जाणीव करून देतात की, आपली मुळं घट्ट असावीत. आपण जमिनीवरच राहावे, हवेत उडू नये.

दीपिकाने नेमक्या शब्दात मोठे तत्त्वज्ञान सांगितलं आहे, म्हणजे जर आपल्या घरची माणसं आपल्या सोबत असतील तर ते आपल्या वागणुकीतले चूक आणि बरोबर दाखवून देतात. त्याच्याने आपले जीवन सुकर होते. आपण सदैव सुखी राहतो. म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण चांगला वेळ या लोकांबरोबर व्यतीत करायला हवा, असा संदेश पण तिनं दिला आहे. चला तर, दीपिका व रणवीर सिंह यांच्या रणथंबोर सहलीचे छान छान फोटो पाहूयात.