झुळझुळीत साडी नेसून दीपिका पादुकोणने केला नव्या...

झुळझुळीत साडी नेसून दीपिका पादुकोणने केला नव्या ब्रॅन्डचा शुभारंभ (Deepika Padukone Launches A New Saree Brand On Mahashivratri)

आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर बॉलिवूडची टॉप अभिनेत्री दीपिका पादुकोणने लिवा द्वारे नव्या साडी ब्रॅन्डचा शुभारंभ केला. नवीन युगाची साडी असे वर्णन केलेल्या नव्यासा या साड्या दीपिकाच्या अंगावर खुलून दिसत आहेत. देशातील चार शहरात आदित्य बिर्ला ग्रुपच्या ह्या साड्या मिळू लागल्या आहेत. दीपिकाच्या अंगी शोभून दिसणाऱ्या या साड्या तरल, मऊ आहेत. नवतरुणींना कामाच्या ठिकाणी, पार्टी किंवा इतर समारंभास नेसता येतील, असे दीपिकाचे म्हणणे आहे. बोल्ड डिझाइन्स असलेल्या या साड्यांचे डिझाइन अबीर आणि नानकी यांनी केले आहे.

या बाबत नानकी म्हणतात, “साडी म्हणजे वृद्ध स्रियांचा किंवा सोज्वळ स्त्रियांचा पोशाख, हा कलंक जणू आम्ही या डिझाइन्समधून पुसून टाकला आहे. अन्‌ मुक्त स्वरूपातील ड्रेस डिझाइन्स सादर केले आहेत.” तर अबीर म्हणतात की, निसर्गावर आधारित फॅब्रिक्सने या साड्या तयार केल्या आहेत. यामुळे साड्यांच्या फॅशनमध्ये क्रांती होईल अशी अपेक्षा आहे.

‘गहराईयां’ या चित्रपटामुळे बोलबाला झालेल्या दीपिकाने या झुळझुळीत साड्यांचा यथायोग्य पुरस्कार केला आहे.