दीपिका पादुकोणची लागली जगातील 10 सुंदर महिलांमध...

दीपिका पादुकोणची लागली जगातील 10 सुंदर महिलांमध्ये वर्णी (Deepika Padukone Is Included In The 10 Most Beautiful Women Of The World)

बॉलिवूडच्या सर्वात हुशार आणि सुंदर अभिनेत्रींच्या यादीत दीपिका पादुकोणचे नाव समाविष्ट झाले आहे. नुकतीच जगभरातील सर्वात सुंदर महिलांची यादी जाहीर झाली असून या यादीत दीपिका पादुकोणच्या नावाचाही समावेश झाला आहे.

जगभरातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत विज्ञानानुसार सर्वात सुंदर कोण आहे हे सांगण्यात आले आहे. यादीतील टॉप 10 मध्ये दीपिका पादुकोणचे नाव सहभागी आहे. हॉलिवूड अभिनेत्री जोडी कॉमर हिला सर्वात सुंदर महिलेचा किताब देण्यात आला आहे. या यादीत किम कार्दाशियन आणि बियॉन्स यांच्या नावाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे दीपिका पदुकोण या यादीत एकमेव भारतीय आहे.

जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत दीपिका पादुकोणचे नाव नवव्या क्रमांकावर आहे, ही यादी वैज्ञानिकांनी जाहीर केली आहे. यूके मधील प्लास्टिक सर्जन डॉ. ज्युलियन डीसिल्वा यांनी अलीकडेच जगातील सर्वात सुंदर महिला घोषित करण्यासाठी ‘गोल्डन रेशियो ऑफ ब्युटी’ नावाच्या प्राचीन ग्रीक तंत्रातील संगणकीकृत नकाशा धोरणाचा वापर केला, ज्यामध्ये त्यांनी जगातील सर्वात सुंदर महिला कोणत्या ते सांगितले.

हॉलिवूड अभिनेत्री जोडी कॉमर हिला डॉ. डीसिल्वा यांनी सर्वात सुंदर महिला म्हणून घोषित केले. त्यानंतर या यादीतील इतर सेलिब्रिटी अनुक्रमे झेंडया (94.37%), बेला हदीद (94.35%), बेयॉन्स (92.44%), एरियाना ग्रांडे (91.81%), टेलर स्विफ्ट (91.64%), जॉर्डिन डन (91.39%) आहेत, किम कार्दाशियन (91.28%), दीपिका पादुकोण (91.22%) आणि होयॉन जंग (89.63%) अशा आहेत. जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत दीपिका पादुकोणचे नाव आल्याने तिचे चाहते खूप खुश झाले आहेत. याबद्दल सर्वजण तिचे अभिनंदन करत आहेत.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम