दीपिका पादुकोणची रंगली होती बरीच प्रेमप्रकरणे :...

दीपिका पादुकोणची रंगली होती बरीच प्रेमप्रकरणे : एकाचे तर तिने खुलेआम चुंबन घेतले होते. (Deepika Padukone Had Many Affairs, Had Openly Kissed With One)

आता बॉलिवूडची अतिसुंदर अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) संसारात स्थिरावली असली तरी याआधी तिची बरीच प्रेमप्रकरणे रंगली आहेत. तिच्या जीवनात कोणकोणते प्रियकर आले होते ते बघूया.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
मॉडेलिंग काळातील प्रकरण: दीपिकाने आपले करियर मॉडेलिंग विश्वातून सुरू केले होते. कित्येक बडया फॅशन डिझायनर्ससाठी दीपिकाने रॅम्पवर वॉक केलेला आहे. या काळात ती मॉडेल व अभिनेता असलेल्या निहार पांडयाशी डेट करत होती. पण दीपिकाच्या करिअरने वेग घेतला व त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. आणि ब्रेक-अप झाला.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
क्रिकेटर्सशी प्रकरण : बॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्रींचे क्रिकेटपटुशी  संबंध आलेले आहेत. काही बातम्या अशाही तेव्हा मिळाल्या होत्या की, दीपिकाचे युवराज सिंह आणि एम. एस. धोनी यांच्याशी चोरून लपून प्रेम जमले होते. ही प्रेमप्रकरणे अधिकृत झाली नसली तरी त्यांच्या चर्चा झडल्याच होत्या.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
सिद्धार्थ माल्याशी जुळले; दीपिकाने आपले प्रेमसंबंध कधीच सर्वांसमक्ष स्वीकारले नसले तरी प्रेम लपून राहत नाही. तेव्हा प्रसिद्ध उद्योगपती विजय माल्यांचा मुलगा सिद्धार्थ याच्याशी दिपीकाचे संबंध होते. या दोघांनी क्रिकेट सामना पाहत असताना खुलेआम चुंबन घेतले, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. कॅमेऱ्याने तो क्षण पकडला. आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला. किंगफिशरची कॅलेंडर गर्ल म्हणून दीपिका सिद्धार्थ माल्याच्या सहवासात आली अन दोघे निकट आले.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
रणबीर कपूरशी लग्न व्हायचे होते : दीपिका बॉलिवूडमध्ये जसजशी यश मिळवत गेली, तसतसे ही प्रकरणे बंद पडली. नंतर इथे रणबीर कपूरशी डेटिंग चालले असल्याच्या चर्चा जास्त रंगल्या. पण  संबंध लग्नापर्यंत पोहचू शकले नाहीत.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
रणविर सिंहशी लग्न : अखेरीस 2012 मध्ये दीपिकाच्या जीवनात रणविर सिंह आला. अन या जोडप्याने काही वर्षांनी इटलीमध्ये, राजेशाही थाटात लग्न केलं.