दीपिका पादुकोण हिने आपल्या मुलांसाठी केले होते ...

दीपिका पादुकोण हिने आपल्या मुलांसाठी केले होते खास प्लॅनिंग (Deepika Padukone Had Made This Special Plan For Her Children, Don’t Know When It Will Be Completed)

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील स्टार कपल आहेत. या दोघांमधील केमिस्ट्रीही खूप जबरदस्त आहे. दोघे कधीही एकत्र बाहेर पडले तर सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळतात. दीपिका आणि रणवीरच्या लग्नाला आता बरीच वर्षे झाली आहेत, त्यामुळे त्यांचे चाहते ते आई-वडील होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.2013 मध्ये दीपिका पादुकोणने आपल्या मुलांच्याबाबतीत केलेल्या प्लॅनिंगचा खुलासा केला होता. त्याची सध्या चर्चा सर्वत्र होत आहे.

शाहरुख खानसोबत 2007 मध्ये ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोणने आतापर्यंत अनेक शानदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री होण्यापूर्वी ती एक लोकप्रिय मॉडेल होती. तिने प्रसिद्ध डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक देखील केला होता. त्यानंतर चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केल्यावर तिने आपल्या चमकदार अभिनयाने आणि सौंदर्याने लोकांची मने जिंकली. आजच्या काळात ती केवळ एक सुपर यशस्वी अभिनेत्रीच नाही तर आपल्या सुखी वैवाहिक जीवनातही खूप आनंदी आहे. पण लग्नाला बरीच वर्षे होऊनही तिने बाळाचे प्लॅनिंग केलेले नाही. रणवीर आणि दीपिकाचे चाहते त्यांच्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

2013 मध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट असलेल्या दीपिका पादुकोणने आपले पुढील 10 वर्षांचे नियोजन सांगितले होते. ती म्हणाली होती की, जर मी अभिनेत्री नसती तर मी काय केले असते माहित नाही, पण भविष्यात मी स्वतःला माझ्या मुलांसोबत पाहते. दीपिका पदुकोण म्हणाली होती की 10 वर्षांनंतर माझे सुखी कुटुंब असेल आणि मला तीन मुले होतील, त्यांना मी शूटिंगला घेऊन येईन.

 2018 मध्ये दीपिकाने रणवीर सिंगसोबत लग्न केले. लग्नाआधी दोघांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केले होते. दीपिका एका चित्रपटात काम करण्यासाठी 14-15 कोटी रुपये फी घेते.

दीपिकाच्या पुढील कामांबद्दल बोलायचे झाल्यास लवकरच ती शाहरुख खानसोबत पठान चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती एका एजेंटची भूमिका साकारणार आहे.